27 C
Mumbai
Tuesday, November 26, 2024
घरराजकारणलसीच्या तुटवड्याचा ठाकरे सरकारचा दावा धादांत असत्य

लसीच्या तुटवड्याचा ठाकरे सरकारचा दावा धादांत असत्य

केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचे सडेतोड

Google News Follow

Related

महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन केंद्र पुरेशा प्रमाणात लसी पाठवत नसल्याची जुनीच रड पुन्हा एकदा लावली होती. मात्र पुन्हा एकदा राज्य सरकारचा रडीचा डाव उघडकीला आला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे ठाकरे सरकारच नाही तर देशातील खोटे आरोप करणाऱ्या इतर राज्यांना देखील सणसणीत चपराक लगावली आहे.

या पत्रकात खोटे आरोप केल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. त्याबरोबरच त्यांनी यातून काही आकडेवारी देखील समोर मांडली आहे. महाराष्ट्रातील कोरोना लसीचा एक डोस मिळालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या ८६ टक्के आहे, तर दोन्ही डोस मिळालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या ४१ टक्के आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी किंवा आघाडीवरील कर्मचाऱ्यांपैकी ७३ टक्के कर्मचाऱ्यांना कोविड लसीचा एक डोस दिला आहे आणि दोन्ही डोस मिळालेल्या कर्मचाऱ्यांची संख्या ४१ टक्के आह. महाराष्ट्रातील केवळ २५ टक्के ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यात आली आहे.

यानंतर डॉ. हर्ष वर्धन यांनी महाराष्ट्र सरकाची लक्तरे काढली आहेत. त्यांनी लसींबाबतचा ठाकरे सरकारचा आरोप म्हणजे, महामारीचा सामना करण्यात सपशेल अपयशी ठरलेल्या ठाकरे सरकारच्या स्वतःच्या अपयशावर पांघरूण घालायचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. त्याबरोबरच महामारी रोखण्यातील ठाकरे सरकारचा नाकर्तेपणा कल्पनातीत असल्याचेही ते म्हणाले आहेत. त्यांनी सांगितले आहे की लसींच्या पुरवठ्यावर केंद्र सरकार सातत्याने लक्ष ठेवून आहे. त्याबरोबरच राज्यांना देखील त्याबाबत वेळोवेळी कळवले जात आहे. त्यामुळे लसींच्या पुरवठ्याबाबतचे आरोप बिनबुडाचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मागील वर्षभरात महामारी हाताळण्याचे काम ठाकरे सरकार अत्यंत ढिलाईने करत आहे. त्याबरोबरच, महामारी हातळण्याबाबतच्या निरुत्साही दृष्टीकोनाने कोरोना रोखण्याच्या देशाच्या प्रयत्नांवर देखील बोळा फिरवला असल्याचा घणाघाती आघात त्यांनी ठाकरे सरकारवर केला आहे.

केंद्र सरकारने ठाकरे सरकारला वारंवार मदत केली, विविध टीम पाठल्या आणि आवश्यक ती संसाधने देखील पुरवली. मात्र ठाकरे सरकारच्या कोणत्याही तऱ्हेने न केलेल्या प्रयत्नांचे फळ आपल्याला दिसत आहेच मात्र ते आपल्याला छळत राहणार आहे. अशा शब्दात मंत्रीमहोदयांनी ठाकरे सरकारच्या गलाथन आणि भोंगळ कारभारावर ताशेरे ओढले आहेत.
आज महाराष्ट्रात रुग्णसंख्येत जगात चिंतेचे कारण बनला असून ठाकरे सरकारच्या संपर्क शोधणे आणि चाचण्या यांत प्रचंड सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. असे सांगून त्यांनी लसीकरणाकडे लक्ष वेधले. महाराष्ट्रातली लसीकरणाची अवस्था उत्तम नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. वैयक्तिक वसूलीसाठी सरकार नागरिकांचे प्राण कसे धोक्यात घालत आहे हे धक्कादायक आहे असेही त्यांनी म्हटले आहे. राज्याचे नेतृत्व मात्र शांतपणे झोपी गलेले पहायला मिळत आहे. अशा शब्दात त्यांनी सरकारचे कान पिळले आहेत.

हे ही वाचा:

…अन्यथा उद्रेक होईल- देवेंद्र फडणवीस

अनिल देशमुखांनी नियुक्तीसाठी मागितले २ कोटी, वाझेच्या कथित पत्रात गौप्य्स्फोट

अयोध्येतील रस्त्याला कोठारी बंधूंचे नाव

अजित पवारांवरही सचिन वाझेकडून आरोपांच्या फैरी

महाराष्ट्र सरकारला अजून बरेच काही करण्याची आवश्यकता आहे आणि केंद्र सरकार ठामपणे त्यांना मदत करेल असे आश्वासनही त्यांनी दिले आहे. परंतु, आपली सारी शक्ती केवळ राजकारणात आणि खोट्या गोष्टी पसरवण्यात घालवण्याने काही साध्य होणार नाही अशा शब्दात त्यांनी कानपिचक्या दिल्या आहेत.
केंद्रीय मंत्री महोदयांनी रोम जळत असताना फिडल वाजवणाऱ्या निरोप्रमाणे आपल्याच धुंदीत मश्गुल असलेल्या ठाकरे सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढल्याने राजेश टोपे यांचे पितळ पुरते उघडे पडले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
198,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा