भाजपाच्या विकासाला ‘सबका साथ’

भाजपाच्या विकासाला ‘सबका साथ’

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’वर भक्कम विश्वास असल्याचे सिद्ध करत, पश्चिम बंगालमधील ख्रिश्चन समुदायाचे नेते रॉडनी बोर्निओ यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे.

हे ही वाचा:

सावधान महाराष्ट्रा सावधान!! कोरोना पुन्हा फोफावतोय!!

कलकत्त्याचे मुख्य पाद्री आणि प्रमुख ख्रिस्ती नेते रॉडनी बोर्निओ यांनी पश्चिम बंगालचे भाजपाचे राज्य प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. “आपल्या पार्टीत तुमचे स्वागत आहे” अशा शब्दात दिलीप घोष यांनी बोर्निओ यांचे स्वागत केले. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बोर्निओ यांनी आपल्या पाद्री पदाचा राजीनामा आर्चबिशप थॉमस डिसुझा यांच्याकडे दिला आहे.

“मला भाजपासोबत काम करायची इच्छा होतीच” असे बोर्निओ यांनी सांगितले आहे. बोर्निओ यांनी ख्रिश्चन मिशनऱ्यांतर्फे चालवल्या जाणाऱ्या लोयोला हायस्कुलच्या मुख्याध्यापक पदावरून देखील राजीनामा दिला आहे.

फादर बोर्निओ हे कलकत्त्यातील किदेरपोरे भागातील अल्पसंख्यांक ख्रिस्ती लोकांमधील प्रसिद्ध चेहरा आहे. फादर बोर्निओ हे पूर्वी तृणमुल काँग्रेसमधील ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय समजले जात होते. सप्टेंबर २०१६ मध्ये तेरेसा यांना संत पद देण्यात आले त्यावेळच्या ममता बॅनर्जी यांच्या व्हॅटिकन भेटीच्या वेळी बोर्निओ हे देखील त्यांच्या सोबत होते. बंगालमध्ये ख्रिश्चन समाज अल्पसंख्याक असला तरी प्रभावशाली ठरू शकतो.

Exit mobile version