कुचिक प्रकरणी माझ्यावरील आरोप धादांत खोटे

कुचिक प्रकरणी माझ्यावरील आरोप धादांत खोटे

भाजपा उपाध्यक्ष चित्रा वाघ यांचे पुणे पोलिस आयुक्तांना पत्र

रघुनाथ कुचिक बलात्कार प्रकरणात माझ्यावर करण्यात आलेले सगळे आरोप धादांत खोटे आहेत. मी पीडितेला सर्वतोपरी मदतच केली आहे, तरीही माझ्यावरच खोटे आरोप केले गेलेत, असे म्हणत भाजपाचा उपाध्यक्षा आणि धडाडीच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी पुणे पोलिस आयुक्तांना लेखी स्वरूपात केली आहे. पोलिसांनी आता या प्रकरणाची सखोल चौकशी करावी असेही त्यांनी म्हटले आहे.

रघुनाथ कुचिकचे कथित बलात्कार आणि गर्भपाताचे प्रकरण सध्या गाजत असून यासंदर्भात पीडित तरुणीने पलटी घेत आता चित्रा वाघ यांच्यावरच आरोप केले आहेत. आपल्यावर कुचिक यांच्यावर आरोप करण्यासाठी दबाव आणला असा आरोप या तरुणीने उपस्थित केला आहे. त्यासंदर्भात चित्रा वाघ यांनी या संपूर्ण प्रकरणावर प्रकाश टाकणारे आणि त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांबाबत स्पष्टीकरण देणारे चार पानी पत्र पुणे पोलिस आयुक्तांना लिहिले आहे.

त्यांनी पत्रात हा संपूर्ण घटनाक्रम वर्णन केला असून शेवटी त्यांनी कुचिक यांच्याकडून कसा दबाव आणला जात आहे हेदेखील नमूद केले आहे.

हे ही वाचा:

कुरापती चीनने सीमेवर उभारले तीन टॉवर

लाऊडस्पीकरसाठी येणार राज्यात नव्या गाईडलाईन्स?

मुंबई पोलिसांचा ‘सोशल मीडिया लॅब’ सक्रीय

‘संपकाळात गैरहजर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेतन नाही’

 

त्यांनी त्यात म्हटले आहे की, रघुनाथ कुचिक हा पीडितेवर सातत्याने दबाव आणत आहे. तिने खोटा जबाब द्यावा यासाठी तिला धमकावले जात आहे. शिवाय, तिने तक्रार मागे घ्यावी अशीही तिला धमकी दिली जात आहे. एवढेच नाही तर कुचिकने हे सगळे करून माझ्याविरोधात खोट्या केसेसे करून त्यात अडकविण्याचा प्रयत्न करत आहे. कुचिकने आपले मित्र, राजकीय मंडळींच्या माध्यमातून मला धमकावण्याचा आणि माझ्यावर खोट्या केसेस टाकण्याची योजना आखली आहे.

Exit mobile version