आरोग्य विभागाच्या परीक्षांमध्ये रोज होत असलेल्या गोंधळांमुळे विद्यार्थी कंटाळले असून आता या गोंधळामुळे भाजपाच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना पत्र लिहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच ही वेळ आणली आहे, असे म्हटले आहे.
चित्रा वाघ यांनी म्हटले आहे, खरंतर तुम्हाला पत्र लिहून व्यथा मांडण्याची गरज नव्हती पण तुमच्या वडिलांनीच ही वेळ आणली आहे. त्यांना तुमच्याशिवाय कुणाचीच चिंता नाही. तुमच्याशिवाय कुणाचे ऐकत नाही, म्हणून तुमच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना ही विनंती करत आहे.
श्री. आदित्य ठाकरे जी यांना पत्र.
पाचव्यांदा आरोग्य विभागाच्या परिक्षेत गोंधळ झाला आहे…
पेपरफुटीनं राज्याचा कारभार चव्हाट्यावर आला आहे…@AUThackeray जी,
विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर तरी डरकाळी फोडावी… pic.twitter.com/2yHC3Tb38q— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) November 1, 2021
आरोग्य विभागाच्या परिक्षेतील गोंधळ मी त्यांच्या निदर्शनास आणून दिला पण कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. विद्यार्थ्यांचे पालक आहेत. हा विसर त्यांना कसा काय पडू शकतो? आज पाचव्यांदा आरोग्य विभागाचा पेपर फुटला आहे. त्यावर माझे हे काही प्रश्न-
- न्यासा एजन्सीची चौकशी का लावली नाही?
- एजन्सीला ब्लॅक लिस्टमध्ये का टाकले नाही?
- एजन्सीला परिक्षेचा अनुभव नसताना कंत्राट का दिले गेले?
- एमपीएससीसारखी विश्वासार्ह संस्था असताना न्यासा एजन्सीची निवड का करण्यात आली?
हे ही वाचा:
राकेश टिकैत यांची पुन्हा एकदा सरकारला धमकी
पाकिस्तानातील हिंदू मंदिरात लुटालूट
मुंबई पोलिसांनी घेतले सचिन वाझेला ताब्यात…
या प्रश्नांची उत्तरे सरकारने द्यावीत. खरंतर चारवेळा ठेच लागूनही पुन्हा पाचव्यांदा परीक्षा घेण्याची जबाबदारी त्याच एजन्सीकडे कशी काय दिली जाऊ शकते? यात तिन्ही पक्षात काही साटंलोटं झालंय का याचा संशय येतो आहे. आपण राज्यभरातील विद्यार्थ्यांचा हा आक्रोश मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवा. आणि वाघ डरकाळी फोडू शकतो हे दाखवून द्यावे.