उर्फी जावेदची घाणेरडी, विकृत वृत्ती महिला आयोगाला मान्य आहे का?

चित्रा वाघ यांनी एक व्हिडिओ ट्विट करत उर्फी जावेद प्रकरणात पुन्हा एकदा आक्रमक

उर्फी जावेदची घाणेरडी, विकृत वृत्ती महिला आयोगाला मान्य आहे का?

चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यात ट्विटरवरून झालेली हमरीतुमरी आपण पाहिलीच आहे. अशात चित्रा वाघ या उर्फी जावेदच्या विरोधात पुन्हा एकदा बोलताना दिसत आहेत,पण या बाबतीत त्यांनी थेट महिला आयोगालाही सवाल केला आहे.

उर्फी जावेदच्या उघडंनागडं फिरण्याला महिला आयोगाचं समर्थन आहे का? असा रोखठोक प्रश्न आता चित्रा वाघ यांनी एक व्हिडिओ ट्विट करत विचारला आहे. चित्रा वाघ ह्या उर्फी जावेद प्रकरणात पुन्हा एकदा आक्रमक झाल्या आहेत.

चित्रा वाघ यांनी महिला आयोगाला उद्देशून काय म्हटलं आहे?

महिला आयोगाची फक्त भाषा नको आहे तर कृती हवी आहे. भर रस्त्यात, सार्वजनिक ठिकाणी उघडंनागडं फिरणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का? उर्फी जावेद अत्यंत बीभत्सपणे रस्त्यावर फिरते आहे. महिला आयोगाने याचा तिला जाब का विचारला नाही? माझा विरोध उर्फी या व्यक्तीला नाही. तर तिच्या उघड्यानागड्या, घाणेरड्या, ओंगळवाण्या आणि किळसवाण्या विकृतीला आहे.

ज्या पद्धतीने महिला आयोगाने भूमिका मांडली त्याचा अर्थ असं उघडंनागडं फिरण्याला महिला आयोगाचं समर्थन आहे का? कायदा कायद्याचं काम करणारच आहे, पोलीस पोलिसांचे काम करतील. आमचं शिंदे फडणवीसांचं सरकार महाराष्ट्रात आहे. सरकार सरकारचं काम करणार आहेच. मात्र महिला आयोगाला याबाबत काही वाटतं आहे की नाही? अशा पद्धतीचा नंगानाच हा महाराष्ट्रात आम्ही खपवून घेणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे. उघडंनागडं सार्वजनिक ठिकाणी फिरणं ही आमची संस्कृती नाही, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा:

अजित पवार माफी मागा, नाहीतर महाराष्ट्रात फिरू देणार नाही

अमेय घोले उद्धव गटाकडून शिंदे गटाच्या वाटेवर?

म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करताय मग हे वाचाच!

‘विज्ञानामुळे महिलांचे सशक्तीकरण आणि महिलांमुळे विज्ञान सशक्त होते’

चित्रा वाघ यांना उर्फी जावेदने ट्विटच्या माध्यमातून उत्तर दिल्यानंतर,  चित्रा वाघ यांनी मला ती कुठे दिसली तर तिचं थोबाड रंगवेन असं वक्यव्य केलं होतं. त्यानंतर महिला आयोगाने या प्रकरणात लक्ष घालून महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर म्हणाल्या की चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदचं थोबाड रंगवण्याची भाषा केली आहे.

चित्रा वाघ यांनी जो इशारा दिला आहे त्यावरून तिच्या जिवालाही धोका असू शकतो. त्यामुळे उर्फीला तिच्या सुरक्षेविषयी काही तक्रारी असतील तर त्या तक्रारींची राज्य महिला आयोग दखल घेईल असं रूपाली चाकणकर यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता आज चित्रा वाघ या महिला आयोगाच्या विरोधात आक्रमक झाल्या आहेत. महिला आयोगाला उर्फी जावेदचं उघडं फिरणं दिसत नाही का? महिला आयोगाचं उर्फीच्या अशा वागण्याला समर्थन आहे का ? असा प्रश्न आता चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे.

Exit mobile version