विद्या चव्हाणांना चित्रा वाघ भिडल्या

विद्या चव्हाणांना चित्रा वाघ भिडल्या

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण यांनी मंगळवार, ३० जुलै रोजी पत्रकार परिषद घेऊन भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यावर आरोप केले. चित्रा वाघ यांनी त्यांच्या सुनेला भडकवल्याचा आरोप त्यांनी केला शिवाय त्यांनी चित्रा वाघ या सुनेला मार्गदर्शन करत असल्याची कथित ऑडिओ क्लीपही ऐकवली. यानंतर चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत विद्या चव्हाण यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

विद्या चव्हाण यांच्या आरोपांना उत्तर देताना चित्रा वाघ यांनी सांगितले की, “डॉक्टरांकडे गेलेली असताना त्यांच्या ओळखीतून विद्या चव्हाण यांची डॉक्टर सून गौरी चव्हाण या तिच्या वडिलांसह भेटायला आल्या होत्या. तिथे त्यांनी त्यांचा जो छळ होत होता, त्याची माहिती दिली. मुलाच्या हव्यासापोटी सूनेचा छळ केला जात होता. गौरी चव्हाण यांना पहिली मुलगी आहे. तसेच विद्या चव्हाण यांच्या धाकट्या मुलानेही त्यांच्या सुनेचा छळ केल्याची तक्रार गौरी चव्हाण यांनी केली,” असे चित्रा वाघ म्हणाल्या.

“चव्हाण यांना पहिला मुलगा हवा होता. पण, मुलगी झाली. नंतर दुसरीपण मुलगी होती. तिची डेथ झाली. डॉक्टरांनी सांगितलं आता तिला मुल होऊ शकत नाही, असं गौरीने सांगितलं. त्याच्यानंतर तिचा छळ सुरु झाला. या बाईच्या धाकट्या मुलाने वहिणीवर हात टाकला; तिचा विनयभंग केला. तिने जेव्हा हे घरी सांगितलं. तेव्हा विद्या चव्हाण यांनी म्हटलं घरात या गोष्टी होतात. या गोष्टी बाहेर काढायच्या नाही. पोलिसात तक्रार करायला गेले तर पोलिसांनीही त्यांना हाकलून दिलं,” असा दावा चित्रा वाघ यांनी केला आहे.

हे ही वाचा..

कौशल्य विकासाच्या प्रशिक्षणातून रोजगारक्षम तरुण तयार होतील

बांगलादेशातील घुसखोर बंगळुरुत करतात काम

भारताच्या खात्यात आणखी एक कांस्य पदक; नेमबाज मनू भाकर, सरबज्योत सिंगने रचला इतिहास

भारताच्या खात्यात आणखी एक कांस्य पदक; नेमबाज मनू भाकर, सरबज्योत सिंगने रचला इतिहास

चित्रा वाघ यांनी असंही म्हटलं की, “सनसनाटी पसरवण्याचा प्रयत्न केला. माझ्याबद्दल चांगलं बोलतील अशी काही अपेक्षाच नाही. माझ्या विरोधात याच्याआधीही मी कशी वाईट आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मी राष्ट्रवादीत २० वर्ष काम करत असताना ११० टक्के योगदान दिले. काम करताना मला कधीही लाभाचे पद मिळेल, अशी अपेक्षा केली नाही. मी कुठलीही अपेक्षा न ठेवता काम केले. पण माझ्याबरोबर पक्षाने काय काय केले, याची मूठ झाकलेली आहे. ती उघडायला लावू नका, नाहीतर पवार साहेबांना त्रास होईल.” आम्ही अनिल देशमुख यांच्या पेन ड्राईव्हची वाट पाहत आहोत. आव्हान केलं होत आणि आजही करत आहे पुरावे द्या. तीन तासात तुमच्या सर्व क्लिप व्हायरल करु, असा इशारा चित्रा वाघ यांनी दिला आहे.

Exit mobile version