सिंधुदुर्ग येथे एका भाषणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी पूजा चव्हाण मृत्युप्रकरणाचा संदर्भ देत भाजपाच्या नेत्या आणि प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांच्यावर आरोप केले. त्यावरून चित्रा वाघ यांनी भास्कर जाधव यांना सुनावले आहे. सध्या उद्धव ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक यांच्याविरोधात भ्रष्टाचाराच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. भ्रष्टाचारविरोधी विभागाच्या वतीने त्यांना नोटीस पाठविण्यात आली आहे. त्याविरोधात सिंधुदुर्गात मोर्चा काढण्यात आला आहे. त्याला संबोधित करताना जाधव यांनी चित्रा वाघ यांच्या उल्लेख केला.
चित्रा वाघ यांनी व्हीडिओच्या माध्यमातून जाधव यांची कानउघाडणी केली आहे. चित्रा वाघ म्हणाल्या की, भास्करशेठ तुम्ही आधी पण आता पण नाच्याचे काम चांगले करता. तेच करा. माझ्या नादी लागू नका. पूजा चव्हाणसाठी मी लढत होती तेव्हा कुठल्या बिळात लपला होतात. की तोंडाला लकवा मारला होता. तुमच्यासारख्या भाडोत्री आणि सुपारीबाजांसारख्यांच्या जीवावर आम्ही लढाई लढत नाही. आम्ही आमच्या जीवावर लढाई लढतो. यापुढे याद राखा आमच्याविरोधात बोलताना १० वेळा विचार करा.
हे ही वाचा:
रॉजर बिन्नी बीसीसीआयचे नवे अध्यक्ष
येरवडा कारागृहातील कैदी जगात हुशार
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं, ६ मृत्यू
प्रवासी भाडे नाकारले तर होणार कारवाई
चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाण प्रकरणाचा पाठपुरावा केला होता. या प्रकरणात संजय राठोड यांचे नाव घेतले गेले होते नंतर त्यांना तत्कालिन महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळातून राजीनामाही द्यावा लागला होता.
या प्रकरणाचा संदर्भ घेत भास्कर जाधव यांनी सिंधुदुर्गात म्हटले होते की, भाजपाने राठोड यांच्यावर आरोपांची राळ उडविली होती. त्या भाजपाच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ सकाळी येऊन मुख्यमंत्री महोदय उद्धव ठाकरे तुमच्याकडून अपेक्षा आहे या माऊलीला न्याय द्या. आता चित्रा वाघ कुठे आहेत. आज ते संजय राठोड मंत्रिमंडळात आहेत.