35 C
Mumbai
Tuesday, November 5, 2024
घरराजकारणत्या तरुणीची पूजा चव्हाण होऊ देऊ नका! चित्रा वाघ यांचा हल्लाबोल

त्या तरुणीची पूजा चव्हाण होऊ देऊ नका! चित्रा वाघ यांचा हल्लाबोल

Google News Follow

Related

पुण्यातील डेक्कन परिसरातील हॉटेलमध्ये फेसबुक लाईव्ह करत आत्महत्येचा प्रयत्न एका तरुणीने केला असल्याची माहिती शनिवारी उघडकीस आली होती. यावेळी तरुणीने फेसबुक पोस्ट करत आरोपीवर कारवाई करण्याची मागणी केली होती. या प्रकरणावरून भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केला आहे.

चित्रा वाघ यांनी रघुनाथ कुचिक यांचा फोटो ट्विट करत म्हटले आहे की, “हाच तो हरामखोर बलात्कारी शिवसेना पुण्याचा नेता रघुनाथ कुचिक. ज्याने एका मुलीवर बलात्कार केला आणि जबरदस्तीने गर्भपात ही करवला. न्याय मिळत नाही म्हणून आत्महत्या करतं स्वत:ला संपवते म्हणत या तरुणीने काल फेसबुक पोस्ट केली होती. अजूनही त्या मुलीचा तपास लागत नाहीये. ती गायब आहे,” असा घाणाघाती आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे.

“कुठे गेलीये ती मुलगी की यानेच तिला गायब केलं आहे?” असा सवाल चित्रा वाघ यांनी विचारला आहे. “या तरुणीची पूजा चव्हाण होऊ देऊ नका. मुख्यमंत्री महोदय आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्या कुचिकवर तात्काळ ३०७ चा गुन्हा दाखल करा. तिच्या मरणाची वाट बघू नका, त्याआधी तिला वाचवा,” अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे.

हे ही वाचा:

जागतिक बाजारात भारतातल्या स्टीलला मोठी मागणी

दहशतवादाशी संबंधित ८१ जणांना सौदी अरेबियात फाशी

‘द काश्मीर फाइल्स’ देशातील प्रमुख शहरांत हाऊसफुल्ल!

मध्य रेल्वेची चित्रीकरणातून २ कोटींची कमाई; हे स्थानक सर्वाधिक पसंतीचे

शिवसेनेचे नेता रघुनाथ कुचिक यांचे पीडित तरुणीसोबत प्रेमसंबंध होते, असा आरोप करण्यात आला आहे. त्यांनी तरुणीला विवाहाचे आमीष दाखवले. या प्रेमसंबंधातून त्यांनी तरुणीसोबत शारीरीक संबंध प्रस्थापित केले. यातूनच पीडित तरुणी गरोदर राहिली. पीडित तरुणीने याची माहिती कुचिक यांना देताच त्यांनी तिला जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पडले, असा आरोप करण्यात आला आहे. गर्भपात न केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत कुठेही वाच्यता केल्यास वाईट परिणाम भोगावे लागेत, असा इशाराही दिला. याबाबत शिवाजीनगर पोलिसांनी रघुनाथ कुचिक यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
187,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा