भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर हल्ला चढवला आहे. पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या बदलीच्या वृत्तावरून चित्रा वाघ आक्रमक झाल्या आहेत. महाराष्ट्रातील सत्ताधारी ठाकरे सरकारने ‘राज्यातील पाचशेहून अधिक महिला तहसीलदारांच्या मनोबल खच्चीकरणाचे काम केले आहे’ असा घणाघात वाघ यांनी केला आहे.
पार्नरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची एक ऑडिओ क्लिप काही दिवसांपूर्वी समाज माध्यमांवर व्हायरल झाली होती. या क्लिपमध्ये त्या आत्महत्या करण्याची इच्छा व्यक्त करताना दिसल्या. नोकरीच्या ठिकाणी कर्तव्य पार पाडत असताना वरिष्ठांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून आपण हा निर्णय घेणार असल्याचे देवरे यांनी म्हटले होते. यावरून राज्याचे राजकारण तापलेले पाहायला मिळाले होते. त्यातच आता देवरे यांची बदली झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या वृत्तावरूनच ठाकरे सरकारवर पुन्हा टीकेची झोड उठताना दिसत आहे. भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ या सरकारवर तुटून पडल्या आहेत.
हे ही वाचा:
संजय राऊतांचे अग्रलेख म्हणजे तालिबानी प्रवृत्तीचे उदाहरण
अभिमानास्पद! भारतात लसीकरणाचा ‘अमृत महोत्सव’
हसन मुश्रीफ आणि कुटुंबियांनी असे केले शेकडो कोटींचे घोटाळे
देशात कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट, केरळमध्ये मात्र भयावह स्थिती
काय म्हणाल्या चित्रा वाघ?
पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची ट्रान्सफर जळगावला झाल्याचे समजत आहे. या सरकारचा जाहीर निषेध. हे सरकार लोककल्याणकारी सरकार नाहीच आहे. हे केवळ यांचे मंत्री यांचे आमदार आणि यांचे बगलबच्चे धार्जिणे सरकार आहे. ही बदली एकट्या ज्योती देवरेंची नाही. राज्यामध्ये पाचशेहून अधिक महिला तहसीलदार काम करतात आणि त्या तहसीलदारांचे मनोबल खच्चीकरण करायचं काम या सरकारने केले आहे. महिला सक्षमीकरण, सशक्तीकरण, महिलांना पुढाकार देणे हे फक्त कागदावरती उरले आहे.
ज्या दिवशी मी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे या संदर्भात पत्र घेऊन गेले होते. त्यादिवशी पारनेरचा आमदार लंके हा अजित दादांकडे गेला असल्याचे मला समजले होते. आमदार निलेश लंके यांनी ॲट्रॉसिटीच्या धमक्या देण्याचे काम केलं, आपले कर्तव्य बजावणाऱ्या कोरोना योध्यांच्या अंगावर तो धावून गेला. महिला डॉक्टर्सना शिवीगाळ केली, एका कर्मचाऱ्याला मारहाण केली, पण अद्याप त्याच्यावर गुन्हा दाखल झाला नाहीये. अजित दादा तुमच्याकडून ही अपेक्षा आम्हाला नव्हती. तुम्ही एकट्या ज्योती देवरेंची बदली केली नाही तर तुम्ही राज्यातल्या पाचशेहून अधिक महिला तहसीलदारांच्या मनोबल खच्चीकरणाचे काम केलं आहे. तुमचा आणि तुमच्या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतोय.
पारनेर तहसीलदार ज्योती देवरेंची जळगावला बदली करण्यात आल्याचे समजते
जाहिर निषेध आहे या महाविकास आघाडी सरकारचा
हे सरकार लोकधार्जीणे नाही तर यांचे आमदार मंत्री बगलबच्चे धार्जिणे आहे@CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @bb_thorat @Dev_Fadnavis @ChDadaPatil @mipravindarekar pic.twitter.com/z7wqocVJ5Y
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) September 13, 2021