‘ठाकरे सरकारने दोन वर्षात १०० कोटी, हजारो कोटींचे टेंडर कमावले’

‘ठाकरे सरकारने दोन वर्षात १०० कोटी, हजारो कोटींचे टेंडर कमावले’

ठाकरे सरकारला आज दोन वर्षे पूर्ण झाली असून त्यावरून विरोधी पक्षाच्या नेत्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सरकारच्या दोन वर्षांच्या कामाची यादी दिली असून सरकारने या दोन वर्षात काय काय गमावले आणि काय काय कमावले याची यादी दिली आहे.

चित्रा वाघ यांनी ट्विट करत म्हटले आहे की, सरकारने या दोन वर्षात अनेक गोष्टी गमावल्या आहेत. महिला सुरक्षा, मुलींचे लहानपण, जेष्ठांचा आदर, पोलिसांचा धाक, मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीचा आब, सत्ताधाऱ्यांची नैतिकता, मंत्र्यांची विश्वासार्हता सरकारने गमावला असल्याचे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा:

… म्हणून पंतप्रधान मोदींनी केले मराठमोळ्या तरुणाचे कौतुक

दो साल, जनतेचे हाल

‘बाबासाहेब पुरंदरे हे इतिहासाचे एनसायक्लोपिडीयाच होते’

नागपूरमधून ८४ लाखांची रोकड जप्त

सरकारने १०० कोटी, १ हजार कोटी, बदल्यांत मलई, कारखान्यांची संपत्ती, हजारो कोटींचे टेंडर, सरकारी भूखंड, फार्म हाऊसचे श्रीखंड कमावले असल्याचे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. सरकारच्या कारभाराची ही यादी देत चित्रा वाघ यांनी सरकारला टोला लगावला आहे.

ठाकरे सरकारने सत्तेत येऊन दोन वर्षे पूर्ण केली असून त्यावरून विरोधी पक्षातील नेत्यांनी सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनीही ट्विटरच्या माध्यमातून सरकारला धारेवर धरले असून आमदार आशिष शेलार यांनीही माध्यमांशी बोलताना सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

Exit mobile version