महाराष्ट्राचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासंदर्भात जे वादग्रस्त वक्तव्य केले, त्यावरून त्यांच्यावर टीका होत असली तरी अशा प्रकरणात नेहमी सिलेक्टिव्हपणा केला जातो, असा आक्षेप भाजपाच्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी घेतला आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपली परखड भूमिका मांडली.
मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याचे समर्थन नाहीच पण महिलांचा अपमान झाल्यावर Selective Outrage कितपत योग्य?
कंगना रणावत स्वप्नाली पाटकर केतकी चितळेबद्दल आवाज का उठला नाही?
महिलांचा अपमान ही महाराष्ट्राची संस्कृती नाही त्यामुळे अशा वक्तव्याचे समर्थन नाहीच सगळ्यांनीच भान ठेवा pic.twitter.com/rVcOB0mMxp
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) November 7, 2022
त्या म्हणाल्या की, महिलांचा सिलेक्टिव्ह आदरसन्मान नको. प्रत्येक महिलेचाच सन्मान व्हायला पाहिजे. अर्थात, महिलांनीही बोलताना तारतम्य बाळगायला पाहिजे. पुरुषांनी तर महिलांचा सन्मानच केला पाहिजे. पण मी महिला आहे म्हणून वाट्टेल ते बोलेन आणि नंतर त्यावर प्रत्युत्तर आले की, मग महिला आहे माझी अस्मिता दुखावली तर हे बरोबर नाही दोघांनी एकमेकांचा आदरसन्मान ठेवला पाहिजे. उत्तराला प्रत्युत्तर असते. ज्यावेळेला मागचे सरकार असते तेव्हा जे बोलले गेले. या सुद्धा मोठ्या नेत्या होत्या तेव्हा त्या म्हणाल्या की, मुख्यमंत्र्यांची मंत्र्यांची प्रतिष्ठा तुम्ही राखली पाहिजे.सत्तार हे मंत्री आहेत. तुम्ही त्यांच्या खात्याशी संबंधित जे काही आहे ते बोला पण तुम्ही जे बोललात त्याला मंत्र्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. अर्थात याला माझे समर्थन नाही.
हे ही वाचा:
नीलमताई गॅरेण्टी उद्धव ठाकरे यांची तरी आहे का?
अरबी भाषा शिक्षकाकडून ८ वर्षांच्या विद्यार्थिनीवर बलात्कार
अब्दुल सत्तारांच्या त्या अपशब्दावरुन राजकीय राडा
कोहली ऑक्टोबर महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू!
चित्रा वाघ यांनी जाब विचारला की, पण महाराष्ट्रात जो सिलेक्टिव्हपणा चालला आहे की, एका पक्षाच्या नेत्याला बोलले की महाराष्ट्राची अस्मिता दुखावली गेली आणि म्हणून आम्ही अमूक मंत्र्याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही. मग अडीच वर्षात काय केले? का नाही संजय राऊतांवर गुन्हे दाखल झाले? एका अभिनेत्रीला हरामखोर म्हणणे योग्य आहे का? ती नव्हती का आपल्या देशातील मुलगी? स्वप्ना पाटकर महाराष्ट्रातील मुलगी नव्हती का, त्यावेळी सर्वज्ञानी संजय राऊत चुकलेले आहेत, अशी भूमिका का घेतली नाही. त्यांच्याविरुद्ध का गुन्हे दाखल केले नाहीत. त्या पण महिला आहेत. यात राजकारण आणण्याची गरज नाही.