27 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरराजकारणपोस्टरवरच्या अंगप्रदर्शनाला आक्षेप घेणारा महिला आयोग उर्फीबाबत गप्प?

पोस्टरवरच्या अंगप्रदर्शनाला आक्षेप घेणारा महिला आयोग उर्फीबाबत गप्प?

भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्ष चित्रा वाघ यांचा घणाघात

Google News Follow

Related

उर्फीच्या प्रकरणात महिला आयोग दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप करत रूपाली चाकणकर यांच्यावर जोरदार टीका चित्रा वाघ यांनी करत सुप्रिया सुळे यांनाही टोला लगावला आहे.

उर्फी जावेदच्या मुद्द्यावरून समाज स्वास्थ्यासाठी एकत्र आले पाहिजे असे म्हणत चित्रा वाघ यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर हल्लाबोल केला आहे. वेब सिरिजवरुन तेजस्वीनी पंडित यांना नोटिस पाठवणाऱ्या महिला आयोगाने ‘उर्फी जावेदवर काय करणार’ असा चित्रा वाघ यांनी सवाल उपस्थित केला आहे. उर्फीच्या नंगानाचाला त्यांचे समर्थन आहे का?असे त्यांनी स्पष्ट करावे असे आवाहन सुद्धा चित्रा वाघ यांनी केले आहे.

एका महिलेने चित्रा वाघ यांना काही व्हिडिओ शेअर केले होते. त्यावेळी त्या महिलेने माझी मुलगी अशा विकृतीला बळी पडल्याचे सांगितले होते. त्यावरून मी हा मुद्दा उपस्थित केला असे चित्रा वाघ यांनी स्पष्ट करत महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या प्रतिक्रियेवरुन अनेक सवाल उपस्थित केले आहेत. यावेळी रूपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्ष पदावर राहण्याचा अधिकार नसल्याचेही चित्रा वाघ यांनी म्हंटले आहे. महाराष्ट्रात उर्फीचा नंगा नाच चालू देणार नाही यासाठी मी बोलले, तिला माझा विरोध नाही तिच्या विकृतीला माझा विरोध आहे, असं चित्रा वाघ पुढे म्हणाल्या

हे ही वाचा:

जितेंद्र आव्हाड आपली सर्वस्वी श्रद्धा औरंगजेबावर आहे!

सोमालियामध्ये दोन कारमध्ये स्फोट, ९ ठार

सिंधुताई सपकाळ अनाथांची माय

रितेशच्या चित्रपटाने प्रेक्षकांना लावले “वेड”

उर्फी जावेदच्या मुद्द्यावर महिला आयोगाची प्रतिक्रिया वाचली, महिला आयोगाचे काम काय आहे, महिलांचा मान सन्मान जपणे, महिला आयोग म्हणतय आम्हाला यामध्ये वेळ वाया घालवायचा नाही ?

महिला आयोगाने यामध्ये हस्तक्षेप का केला नाही,अश्लील व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहे त्यामुळे महिला आयोग जबाबदारी विसरले आहे की काय ? असा प्रश्न उपस्थित केला आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षांना तिथं बसण्याचा अधिकारच काय ? दुटप्पीपणा करणाऱ्या महिला आयोगाचे खरं रूप आपल्याला दिसते,अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि संजय जाधव यांना त्यांनी नोटिस बजावली होती, धूम्रपान समर्थन अंगप्रदर्शनचा संदेश जात असल्याचे सांगत दखल घेऊन नोटिस पाठविली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा