भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाणचा मृत्यू झालेल्या वानवडी परिसरातील इमारतीला भेट देत पाहणी केली. यावेळी त्यांनी अकरा वाजता सविस्तर बोलणार असल्याचं स्पष्ट केलं. “पूजा चव्हाण राहत होती तो फ्लॅट सील आहे. वरचे चार फ्लॅट बंद आहेत. आम्ही त्या फ्लॅटच्या वरच्या फ्लॅटची पाहणी केली आहे. गॅलरीतील ग्रीलची पाहणी केली आहे. ग्रीलची उंची पाहता पूजा चव्हाण स्वत: खाली पडली? का तिला खाली ढकललं गेलं? हे प्रश्न तसेच आहेत. अकरा वाजता पत्रकारांशी बोलणार आहे.” असं त्या म्हणाल्या.
चित्र वाघ यांनी पूजा चव्हाणचा मृत्यू झाला त्या ठिकाणाची माहिती घेतली. भाजपच्या स्थानिक नगरसेवकांनी त्यांना यासाठी मदत केली. राठोडच्या राजीनाम्याबद्दल विचारल्यावर “मी अकरा वाजता सगळं बोलणार आहे.” असं वाघ म्हणाल्या. चित्रा वाघ यांनी इमारतीची पाहणी करण्यापूर्वी पूजा चव्हाणच्या प्रतिमेला आदरांजलीदेखील वाहिली.
हे ही वाचा:
चित्रा वाघ यांनी वानवडी पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस अधिकाऱ्यांशी या विषयावर चर्चा केली. यावेळी पोलीस अधिकारी या प्रकरणात कोणत्याही प्रकारचे सहकार्य करत नसल्याचे चित्रा वाघ यांनी सांगितले. पोलिसांना या प्रकरणात ‘सुओ मोटो ऍक्शन’ म्हणजेच स्वतः पुढाकार घेऊन कारवाई करण्याचे अधिकार असूनही पोलीस अशी कारवाई का करा नाहीत? असा प्रश्न चित्रा वाघ यांनी पोलिसांना केला. यावर पोलिसांनी आम्हाला असे अधिकारच नसल्याचे सांगितले. यावर चित्रा वाघ पोलिसांवर संतापल्या आणि पोलीस लोकांची फसवणूक करत आहेत असे म्हणाल्या. चित्र वाघ यांनी, “पोलीस हे रक्षक राहिले नसून भक्षक झाले आहेत.” असे विधानही केले.