चित्रा वाघ यांनी ‘त्या’ मुलीच्या नावावर राजकारण केले

चित्रा वाघ यांनी ‘त्या’ मुलीच्या नावावर राजकारण केले

पुण्यातील शिवसेनेचे नेते रघुनाथ कुचिक यांच्यावरती बलात्काराचा आरोप करणाऱ्या पीडित तरुणीने आज अचानक पलटी मारल्यानंतर तिने भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्यावरच आरोप केले आहेत. त्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

चित्रा वाघ यांनी सुसाईड नोट या तरुणीला लिहायला लावली. कोणताही विचार न करता राजकारण केलं गेलं, अशी टीका नीलम गोऱ्हे यांनी चित्रा वाघ यांच्यावर केली आहे. पीडीतेला कोणीही मदत केली नाही हा आरोप चुकीचा असल्याचे नीलम गोऱ्हे म्हणाल्या. अशा घटना घडल्या त्यावेळेस पोलिसांनी दखल घेतल्याचे त्यांनी सांगितले. चित्रा वाघ या रोज वेगवेगळ्या गोष्टी वाहिन्यांवर बोलत होत्या त्याचा परिणाम झाला आहे का याचीही माहिती घ्यायला हवी, असे नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

पीडीतेने जबाब का बदलला हे तपासात समोर येईलच. या प्रकरणात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील लक्ष घालतील, असेही नीलम गोऱ्हे म्हणाल्या. तसेच मुलींचा असा वापर करणे चुकीचे असल्याचे नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

हे ही वाचा:

‘दहशत माजवण्याचा मविआ कडून प्रयत्न’

ती तरुणी खोटे का बोलत आहे माहीत नाही, पण मी अजूनही तिच्या पाठीशी!

वंचितच्या सुजात आंबेडकरांनी ब्राह्मणांना केले लक्ष्य

कुचिक बलात्कार पीडित तरुणीचे चित्रा वाघ यांच्यावर आरोप

दरम्यान, आज या तरुणीने पलटल्यावर चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण पीडीतेला मदत केल्याचे सांगितले. तसेच त्यांनी या तरुणीचे काही मेसेज वाचून दाखवले. तरुणीला गरज असताना कोणीही मदतीला पुढे आलेले नव्हते मात्र, आता चित्रा वाघ विरुद्ध बोलायला लागल्यावर सर्वजण पुढे आल्याचे चित्रा वाघ म्हणाल्या. तसेच ती तरुणी आता खोट का बोलत आहे ते माहित नाही मात्र तरीही तिच्या पाठीशी असल्याचे त्या म्हणाल्या.

Exit mobile version