त्या हिंदू तरुणीला न्याय मिळण्यासाठी लव्ह जिहाद कायदा महाराष्ट्रातही गरजेचा

त्या हिंदू तरुणीला न्याय मिळण्यासाठी लव्ह जिहाद कायदा महाराष्ट्रातही गरजेचा

टिळकनगर, चेंबूर येथे ४ दिवसांपूर्वी लव्हजिहादच्या घटनेत हिंदू मुलीची मुस्लीम रितीरिवाज पाळत नसल्याचे कारण देत तिच्या मुस्लिम नवऱ्याने हत्या केल्याचे प्रकरण समोर आले. गळा चिरून त्या मुलीची हत्या त्याने केली. तिच्या नवऱ्याला अटक करण्यात आली आहे. यासंदर्भात भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी या मुलीच्या कुटुंबियांची भेट घेतली.

त्या मुलीच्या परिवाराची नगरसेविका आशा मराठे यांच्यासह चित्रा वाघ यांनी भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले तसेच त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. अशा घटना पाहिल्यावर जीव पेटून उठतो, अशी प्रतिक्रिया व्यक्त करत मुलीच्या परिवाराचा आर्त स्वर अजुनही कानात घुमतोय, असे चित्रा वाघ म्हणाल्या. चित्रा वाघ यांनी अशीही मागणी केली की, उत्तरप्रदेशच्या धर्तीवर “लव्हजिहाद” कायदा महाराष्ट्रातही गरजेचा वाटतोय. तो व्हायला हवा. या घटनेची दखल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गांभीर्याने घेतली आहे. संबंधीत पोलिसांना सूचना दिलेल्या आहेत. शिवाय चांगल्यात चांगले सरकारी वकील देत केस लढू ज्यामुळे मुलीच्या परीवाराला न्याय मिळेल ही सरकारची भूमिका आहे.

हे ही वाचा:

मार्चपर्यंत मुंबई होणार खड्डेमुक्त

काबूलमध्ये शाळेत आत्मघाती बॉम्बस्फोट, शंभर मुलांचा मृत्यू

काँग्रेसचा अध्यक्ष, अध्यक्ष खेळ सुरूच

मुंबई विमानतळावर महिलेकडून कोकेन जप्त

 

सदर मुलीने या मुस्लीम तरुणाशी विवाह केला. पण हे त्याचे तिसरे लग्न असल्याचे कळते. त्याने तिला मुस्लिम रितिरिवाजाप्रमाणे राहण्यास सांगितले. पण तिने त्यास नकार दिल्याचे एफआयआरमध्येही नमूद करण्यात आले आहे. त्यातून त्यांच्यात भांडणे सुरू झाली. अखेर त्याने तिच्यावर चाकुने वार करत तिचा गळा चिरला आणि त्यात तिचा मृत्यू झाला. गेल्या काही महिन्यात अशाच घटना देशभरात विविध ठिकाणी घडलेल्या पाहायला मिळाल्या आहेत.

Exit mobile version