गेल्या दोन दिवसांपासून निर्भया पथकाची वाहने मंत्र्यांच्या सुरक्षेसाठई वापरली जात आहे यासारखा कांगावा केला जात आहे. हे करतंय कोण. एक आहेत माजी मंत्री आदित्य ठाकरे. ते म्हणत आहेत की या गाड्या गद्दारांच्या सुरक्षेसाठी वापरण्यात येतात ही लाजीरवाणी बाब. मात्र याच गाड्या मविआ सरकारमधील मंत्री, खासदार, आमदारच वापरत असल्याचे समोर आले आहे. भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्ष चित्रा वाघ यांनी मविआचा हा खरा चेहरा उघड केला आहे. महिलांच्या अत्याचारासाठी जेव्हा यांचं सरकार होतं तेव्हा अत्याचार वाढत आहेत विशेष अधिवेशन घ्या अशी मागणी आम्हीच करत होतो पण तेव्हा अधिवेशन घेतले नाही उलट आमच्यावरच गुन्हे दाखल केले, असा आरोप चित्रा वाघ यांनी केला.
त्यांनी आदित्य ठाकरेंप्रमाणेच प्रियंका चतुर्वेदी यांनाही लक्ष्य केले. त्या म्हणाल्या की, कधीतरी बोलण्याची संधी मिळते पण त्याही बोलल्या गद्दार आमदार निर्भया फंडातून घेतलेली वाहने वाय प्लस सुरक्षेसाठी वापरत आहेत. या सगळ्या प्रक्रियेचे ऑडिट केले पाहिजे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोठ्या नेत्या सुप्रिया सुळे म्हणतात, निर्भया फंड मनमोहन सिंग यांनी सुरू केला. या फंडातून महिलांच्या सुरक्षेसाठी घेतलेली वाहने आमदारांच्या सुरक्षेसाठी वापरणं चुकीचं आहे, हे व्हीव्हीआयपी कल्चर असलेलं सरकार आहे.
📍 चित्राताई वाघ यांची भाजप कार्यालय नरिमन पॉईंट येथे पत्रकार परिषद @ChitraKWagh https://t.co/MvDYSJYmy2
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) December 12, 2022
यासंदर्भात चित्रा वाघ यांनी वस्तुस्थिती मांडली आहे. त्या म्हणाल्या की, केंद्र सरकारकडून २२० वाहनं निर्भया निधीतून मविआ सरकारने म्हणजेच काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचं सरकारने खरेदी केलं. ही वाहने निर्भया पथकांसाठी होती पण २२० वाहनात काय केलंय यांनी. याच्यातील १२१ वाहन ही त्या सरकारने मुंबईतल्या ९४ पोलिस स्टेशनला दिली. ९९ वाहनं ही महाविकास आघाडी सरकारने इतर विभागांना वाटली. मविआनेच त्यांच्या कार्यकाळात इतर विभागांना वाटली आता मात्र शिंदे फडणवीस सरकारच्या नावाने बोंब मारत आहे. उलटा चोर कोतवाल को डाँटे.
चित्रा वाघ यांनी आरोप केला की, मविआ सरकारच्या काळात ४ फेब्रुवारी २०२२ रोजी निर्भया निधीतून २२० वाहने खरेदी केली. यापैकी १२१ वाहने ९४ पोलिस स्टेशनला दिली. त्यानंतर ९९ वाहने स्वतः इतर विभागांना वाटली त्याची तारीख आहे १९ मे २०२२ रोजी. सगळ्यात आश्चर्य म्हणजे त्या ९ मत्र्यांच्या दावणीला बांधलेल्या होत्या. १२ वाहने यात व्हीव्हीआयपी ताफ्यासाठी दिल्या. २२० पैकी १२१ गाड्या ९४ पोलिस ठाण्यांना. ९९पैकी ९ गाड्या मंत्र्यांच्या दावणीला तर १२ व्हीव्हीआयपीसाठी. त्यात कोण कोण होतं. भुजबळ, विजय वडेट्टीवार, सुनील केदार, सुनील तटकरे, सुभाष देसाई, तुम्ही बघा हे मंत्री या तिन्ही पक्षांच्या व्हीव्हीआयपी ताफ्यात निर्भया फंडाची गाडी होती. आश्चर्य याचे की ज्यांन प्रश्न उपस्थित केले त्या खुद्द सुप्रिया सुळे यांच्या ताफ्यातही निर्भयाची गाडी वापरण्यात आली. त्यांनी वापरली आणि आता शिंदे फडणवीसांच्या नावाने जो आटापीटा चालला आहे तो दुटप्पीपणा कशासाठी ताई. ताई तुम्हाला हे शोभत नाही.
हे ही वाचा:
जी २० च्या पहिल्या विकास कार्यगटाची होणार मुंबईत बैठक
अनधिकृत फेरीवाल्यांकडून जप्त करण्यात आलेल्या सिलिंडरचा झाला स्फोट
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताच्या पाठीशी रशिया
निर्भया निधीतून वाहने खरेदी करण्यात आली. ९९ वाहने त्यासाठी नव्हती. जलद प्रतिसाद पथक, श्वान पथक, सुरक्षा शाखा, आर्थिक गुन्हे, लाचलुचपत, मोटार परिवहन यांना गाड्या देण्यात आल्या ज्या यांच्यासाठी नव्हत्याच. मंत्र्यांच्या ताफ्यात देण्यात आल्या. ज्या खात्यांशी संबंध नाही. त्यांनाही देण्यात आल्या, असेही चित्रा वाघ यांनी नमूद केले. त्या म्हणाल्या की, या निधीतून घेण्यात आलेली वाहने आदित्य ठाकरे यांच्या मतदार संघात देण्यात आली. त्यातील १७ गाड्या आदित्य यांच्या मतदारसंघात दिल्या. तत्कालिन गृहविभागाला त्यांना लाज वाटली नाही. १७ गाड्या मतदारसंघात दिल्या. त्या महिलांच्या सुरक्षेसाठी नव्हत्या. महिला नागवली जात होती. विशेष अधिवेशनासाठी मागणी करत होतो. स्वतःच्या दावणीला बांधताना लाज वाटली नाही वर आम्हाला तोंड वर करून प्रश्न विचारता. तुम्हाला सांगायचं हे लोकांचं सरकार आहे. त्याठिकाणी या सगळ्या गाड्या निर्भया पथकात घेण्याची प्रक्रिया चालू आहे. आठव्याभरात ही प्रक्रिया पूर्ण होईल. २२० गाड्या महाराष्ट्राच्या मुलींच्या महिलांच्या विकासासाठी देणआर आहोत. उलटा चोर कोतवालको डाँटे.