31 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरराजकारणसंजयजी...आता कोणाचे थोबाड फोडायचे?

संजयजी…आता कोणाचे थोबाड फोडायचे?

Google News Follow

Related

भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र उपाध्यक्षा चित्र वाघ महाराष्ट्रात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांवरून चांगलेच कडाडल्या आहेत. डोंबिवलीत झालेल्या बलात्काराच्या घटनेवरून त्या संतापल्या आहेत. यावरूनच त्यांनी शिवसेना खासदार आणि सामानाचे संपादक संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. ट्विटरच्या माध्यमातून चित्र वाघ यांनी राऊतांवर टीकास्त्र डागले आहे.

गुरुवार, २३ सप्टेंबर रोजी डोंबिवली येथून बलात्काराचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका पंधरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर गेले नऊ महिने आळीपाळीने २९ जणांनी अत्याचार केला. ही घटना उघडकीस आल्यानंतर सारे राज्य सुन्न झाले आहे. तर पुन्हा एकदा राज्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

हे ही वाचा:

संयुक्त राष्ट्रसंघात तालिबान?

‘ऑकस’नंतर बायडन-मॅक्रॉन “मैत्रीपूर्ण” फोन

क्वाड लवकरच भारतात बनवणार एक अब्ज लसी

LIC IPO: एलआयसी आयपीओ मधून चीनी ‘कम’

भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा चित्र वाघ या घटनेची माहिती मिळताच डोंबिवली येथे पोहचल्या. तिथे जाऊन त्यांनी या प्रकरणाचा तपास करणाऱ्या मानपाडा पोलिस स्टेशन येथे जाऊन तपासाची माहिती घेतली. नंतर याच प्रकरणावरून चित्र वाघ यांनी आपला संताप व्यक्त केला असून शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर तोफ डागली आहे.

“सर्वज्ञानी संजय राऊतजी…डोंबिवलीत १४ वर्षीय मुलीवर ३३ नराधमांनी बलात्कार केल्याची घटना घडलीये कळलयं का आपल्याला ?? आता कुणाचं थोबाडं फोडायचं संजयजी ??? आहे का सरकारचं थोबाड फोडायची हिम्मत आपल्यात ??” असे चित्र वाघ यांनी म्हटले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
195,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा