‘किमान रावणाला मदत करणारी ‘शूर्पणखा’ तरी महिला आयोगावर नको!’

‘किमान रावणाला मदत करणारी ‘शूर्पणखा’ तरी महिला आयोगावर नको!’

भारतीय जनता पार्टीच्या उपाध्यक्ष आणि महिलांच्या प्रश्नांवरून सडेतोड भूमिका मांडणाऱ्या चित्रा वाघ यांनी राज्याच्या महिला आयोगासंदर्भातील केलेल्या ट्विटवरून चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.

चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटमध्ये महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून ज्यांचे नाव चर्चेत आहे त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली चाकणकर यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले आहे. त्या आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, महिलांचे शील भ्रष्ट करणारे रावण राजरोस फिरत आहेत, पण राज्य महिला आयोगाला अद्याप अध्यक्ष नाही हे लाजीरवाणे आहे. अध्यक्ष लवकर नेमावा पण महिलांच्या क्षेत्रात काम करणारी कोणी अनुभवी मिळत नसेल तर किमान रावणाला मदत करणारी शूर्पणखा तरी तिथे बसवू नका. अन्यथा प्रत्येक वेळी सरकारचंच नाक कापलं जाईल.

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत अनेक बलात्काराच्या घटना समोर आल्या. त्यामुळे महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. पुणे, मुंबई, अमरावती, नागपूर अशा विविध ठिकाणी बलात्कार आणि हत्यांच्या भयंकर घटना घडल्यानंतर त्यावर समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. पण असे असतानाही राज्यातील महिला आयोगासाठी राज्यातील ठाकरे सरकारकडून कुणाचेही नाव पुढे आले नाही. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली चाकणकर यांचे नाव या पदासाठी पुढे येते आहे. त्या अनुषंगाने चित्रा वाघ यांनी उपरोक्त ट्विट केले आहे.

 

हे ही वाचा:

जळगावचे राजकारण फिरले! महापालिकेत पुन्हा भाजपाचे बहुमत

एअर इंडिया नंतर मोदी सरकार ‘या’ कंपनीचे खासगीकरण करणार

मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय निवडणूक; अर्ज घेताना निवडणूक अधिकारीच गायब

राजस्थानमधील काँग्रेसचे मंत्री म्हणाले, महिला कर्मचारी म्हणजे डोकेदुखी!

 

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रमुख मेहबूब शेख यांच्यावर असलेल्या आरोपांचा संदर्भ या ट्विटमागे असल्याचे दिसते. असा आरोप असतानाही कोणतीही चौकशी झालेली नाही.

Exit mobile version