चिराग पासवान यांची लोक जनशक्ती पक्षाच्या (रामविलास) अध्यक्षपदी फेरनिवड

बैठकीत पाच वर्षांसाठी झाली निवड

चिराग पासवान यांची लोक जनशक्ती पक्षाच्या (रामविलास) अध्यक्षपदी फेरनिवड

केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांची लोक जनशक्ती पक्षाच्या (रामविलास) अध्यक्षपदी पुन्हा एकदा निवड झाली. चिराग पासवान यांची पुढील पाच वर्षांसाठी फेरनिवड करण्यात आली आहे. बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आल्याचे पासवान यांनी सांगितले.

लोक जनशक्ती पार्टीच्या (रामविलास) राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक रांची पार पडली. या बैठकीनंतर चिराग पासवान यांनी पत्रकार परिषद घेऊन बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती दिली. तसेच त्यांनी बैठकीत पुन्हा एकदा राष्ट्रीय अध्यक्षपदी त्यांची निवड झाल्याचे सांगितले. एनडीए अंतर्गत किंवा आम्ही जिथे मजबूत आहोत तिथे एकट्याने निवडणूक लढवू. आम्ही एनडीएचा भाग आहोत. झारखंडमध्ये युतीने निवडणूक लढवणार, असं ते म्हणाले. सोबतच त्यांनी एकट्यानेही निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. कार्यकारिणीच्या बैठकीत देशातील अनेक प्रश्नांवर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. सबका साथ सबका विकास घेऊन आम्ही पुढे जात आहोत.

चिराग पासवान यांना पुन्हा एकदा लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) राष्ट्रीय अध्यक्ष करण्यात आल्याने पक्षात एकता आणि स्थैर्य असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तसेच चिराग पासवान यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला बळ मिळणार असून या निर्णयामुळे पक्षाचा विस्तार बिहारमध्येच नाही तर देशभरात शक्य असल्याचे बोलले जात आहे. पक्षाचे सर्वेसर्वा दिवंगत रामविलास पासवान यांच्यावर पक्षाच्या लोकांचा जसा विश्वास होता, तसाच विश्वास पक्षाच्या नेत्यांमध्ये चिराग पासवान यांच्यावरही निर्माण होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, चिराग पासवान यांनी पंतप्रधानांप्रती कृतज्ञता व्यक्त करत एलजेपी झारखंडमध्ये अनेक कार्यक्रम आयोजित करणार असल्याचे सांगितले आहे. एलजेपीने जाहीरनाम्याचे कामही सुरू केले आहे. झारखंडमध्ये एनडीएचे सरकार स्थापन होईल कारण सध्याच्या हेमंत सरकारबाबत लोकांमध्ये नाराजी आहे. झारखंडमध्ये लोकांना बदल हवा आहे. एनडीएच्या नेतृत्वाखाली झारखंड विकसित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

हे ही वाचा :

विकसित भारताच्या वाटचालीत मातृशक्तीचा मोठा हातभार; लखपती दीदींना मोदींचे अभिवादन !

पश्चिम रेल्वेवर ३५ दिवसांचा ब्लॉक; ९६० लोकल फेऱ्यांवर होणार परिणाम

बांगलादेशातील हिंदू अत्याचाराविरोधात अमरावतीत आक्रोश !

काँग्रेस आणि समाजवादी पक्ष आरक्षणविरोधी

जम्मू-काश्मीरमधील काँग्रेस आणि एनसी यांच्या युतीबाबत चिराग पासवान म्हणाले की, देशविरोधी शक्तींना हटवण्यासाठी ३७० हटवण्यात आले आणि काँग्रेस त्याला पाठिंबा देत आहे. पण, आमचा याला विरोधचं आहे. आम्हीही केंद्र सरकारच्या पाठीशी उभे आहोत.

Exit mobile version