भारतातील कम्युनिस्ट पक्षांआडून चीन खेळत होता डावपेच

भारतातील कम्युनिस्ट पक्षांआडून चीन खेळत होता डावपेच

अणुकरारासंदर्भात विजय गोखले यांच्या पुस्तकात दावा

भारताचे माजी परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी लिहिलेल्या ‘द लाँग गेम : हाऊ द चायनीज नेगोशिएट विथ इंडिया’ या पुस्तकातून भारतातील कम्युनिस्ट पक्ष आणि चीन यांच्यात जवळचे संबंध असल्याचे उघड झाल्यामुळे या पक्षांचा बुरखा फाटला आहे.

२००७ ते २००९ या कालावधीत गोखले हे चीनमध्ये पूर्व आशियाचे संयुक्त सचिव या नात्याने गेले होते. भारतातील स्थानिक राजकारणात हस्तक्षेप करण्याची ती बहुदा चीनची पहिलीच वेळ होती, असेही गोखले यांनी पुस्तकात नमूद केले आहे.

त्यांच्या या पुस्तकात सहा महत्त्वाच्या विषयांना स्पर्श करण्यात आला आहे. त्यात चीनने भारत-अमेरिका अणुकरार निष्फळ करण्यासाठी भारतातील कम्युनिस्ट पक्षांशी असलेल्या जवळीकीचा कसा फायदा उचलला हे या पुस्तकातील एका प्रकरणात स्पष्ट करण्यात आले आहे. ते म्हणतात की, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) यांचे नेते चीनला बैठकांसाठी किंवा वैद्यकीय उपचारांसाठी जात असत.

गोखले लिहितात की, डाव्या पक्षांचा तत्कालिन यूपीएच्या मनमोहन सिंग सरकारमध्ये काय प्रभाव लक्षात घेत चीनने त्यांचा फायदा उठविण्याचे ठरविले. कारण भारताचा अमेरिकेकडे असलेला कल या पक्षांसाठी चिंतेचा विषय होता. भारतातील स्थानिक राजकारणात हस्तक्षेप करण्याचा हा चीनचा पहिलाच प्रयत्न होता. पण ते कधी समोर आले नाहीत. त्यांनी पडद्याआडूनच डावपेच खेळले.

गोखले म्हणतात की, या कालावधीत चीनने भारताशी ज्या पद्धतीने संवाद साधला, तो चीनने १९९८मध्ये अणुचाचण्यांच्या वेळेला जी घेतलेल्या भूमिकेच्या विसंगत होता. भारत-अमेरिका यांच्यातील अणुकराराच्या मुद्द्यावर भारतात विरोधी वातावरण निर्माण करण्याचा चीनचा प्रयत्न होता. त्यासाठी ते डाव्या पक्षांच्या माध्यमातून आणि डावीकडे झुकलेल्या प्रसारमाध्यमांचा उपयोग करत होते.

हे ही वाचा:
गोगरा पॉईंटवर तोडगा निघाला!!!

राहुल गांधीचा नेम पुन्हा चुकला

सुट्टीवर निघालेल्या जवानावर घातला काळाने घाला

अहिंसेच्या विचारांना काँग्रेसनेच दिली मूठमाती; उपसभापतीला मारहाण

यासंदर्भात भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट केले आहे की, डाव्या पक्षांची निष्ठा कशी लाल चीनच्या पायाशी लोटांगण घालते, ते माजी परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी उघड केलंय. चीनच्याच इशाऱ्यावरून माकप, भाकपने अणुकराराला विरोध केला होता. नक्षलींना फूस लावण्याची मानसिकताही अशाच विकलेल्या नैतिकतेतून उपजलेली.

Exit mobile version