लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या जवानांमध्ये उडालेल्या चकमकीबाबत ऑस्ट्रेलियाच्या क्लॅक्झॉन या वेबपोर्टलने एक खळबळजनक अहवाल उघड केला आहे. या अहवालात असे स्पष्ट करण्यात आले आहे की, १५ ते १६ जून या कालावधीत गलवान नदी ओलांडण्याच्या प्रयत्नात चीनचे ३८ जवान वाहून गेले. म्हणजे चीनने केवळ ४ जवान मृत्युमुखी पडल्याचा जो दावा केला होता, तो खोटा ठरला असून एकूण ४२ जवान मृत्युमखी पडलेले आहेत.
१५ जून २०२० रोजी भारत आणि चीनच्या जवानांमध्ये गलवान खोऱ्यात संघर्ष झाला. त्यात भारताचे काही जवान मृत्युमुखी पडले. त्याबद्दल भारताने माहिती जाहीर केली तसेच शहीद झालेल्या जवानांना उचित सन्मान दिला. पण चीनने आपले किती जवान जखमी झाले किंवा मृत झाले हे आकडे लपवले होते.
त्यानंतर मात्र २०२१मध्ये चीनने आपल्या सेनादलातील काही जवानांना मरणोत्तर पुरस्कार दिले. त्यावरून या संघर्षात काही जवान मृत्युमुखी पडल्याचे स्पष्ट झाले.
पण आता क्लॅक्झॉनच्या ताज्या अहवालानुसार चीनी लष्कराचे ३८ जवान वाहून गेल्याचे समोर आले आहे. १५ जून २०२०च्या रात्री जेव्हा गलवान नदीजवळ भारत-चीन यांच्या जवानांमध्ये संघर्ष उफाळला तेव्हा भारताने त्या संघर्षात आपले २० जवान शहीद झाल्याचे स्पष्ट केले होते. पण चीनने आपल्या जवानांबद्दल कोणतीही माहिती दिली नव्हती. पण चीनचे अनेक जवान गलवान नदी ओलांडताना वाहून गेले होते. चीनने मात्र एक अधिकारी वाहून गेल्याचे म्हटले होते. या अधिकाऱ्याचे नाव वांग झुओरंग असे होते. या अहवालात म्हटल्याप्रमाणे चीनचे लष्करी जवान हातात शस्त्र घेऊन नदी ओलांडत होते. पण ते घसरून वाहून गेले. वांगने चार जवानांना एकापाठोपाठ एक नदीतून पलिकडे जाण्यासाठी ढकलले पण त्याचे स्वतःचे पाय नदीतील दगडांत अडकले आणि तो वाहून गेला.
क्लॅक्झॉनने चीनचा यासंदर्भातील अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार क्लॅक्झॉनच्या अहवालाला पुष्टी मिळते. चीनचा हा अहवाल आता मात्र वेबसाईटवरून काढून टाकण्यात आला आहे.
असा घडला होता संघर्ष
क्लॅक्झॉनच्या अहवालात म्हटले आहे की, २२ मे २०२० ला भारतीय जवानांनी गलवान नदीवर तात्पुरता पूल बांधण्यास सुरुवात केली. भारतीय जवानांचे नेतृत्व कर्नल संतोष करत होते. या पुलाच्या सहाय्याने चीनच्या हालचालींवर लक्ष ठेवणे शक्य होणार होते. पण चीनी लष्कराकडून भारताच्या या बांधकामाला विरोध झाला. ६ जूनला चीनचे काही जवान हा पूल तोडण्यासाठी पुढे सरसावले. त्यांना रोखण्यासाठी भारताच्या १०० तुकड्या पुढे आल्या. पण ६ जूननंतर दोन्ही बाजूंनी याबाबत एकमत झाले की, दोन्ही बाजूंकडून करण्यात आलेले बांधकाम काढून टाकावे.
पण चीनी लष्कराने आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे वचन मोडले. उलट आपण बांधलेला पूल तोडण्याऐवजी त्यांनी भारताने बांधलेला पूल तोडण्यास सुरुवात केली. त्यावेळी कर्नल संतोष बाबू यांनी चीनने केलेले अतिक्रमण तोडण्यासाठी पुढाकार घेतला. तेव्हा चीनचे १५० जवान तिथे होते. त्यांचे नेतृत्व कर्नल की फबाओ करत होता. त्याने संवाद साधण्याऐवजी संघर्षाचा पवित्रा घेतला. पण भारताने त्याला लगाम घातला. फबाओच्या मदतीसाठी चीनचा कमांडर होंगजुन आणि सैनिक चेन आले. त्यांनी भारतीय जवानांवर स्टील पाईप, काठ्या, दगड यांनी आक्रमण केले.
हे ही वाचा:
मुस्लिम विद्यार्थिनींच्या हिजाब आग्रहाविरोधात हिंदू विद्यार्थ्यांनी असा केला निषेध!
मालेगाव प्रकरणातील साक्षीदार म्हणाला, आरएसएस नेत्यांची नावे देण्यास भाग पाडले!
असा असणार ‘स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी’
‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’नंतर आता पंतप्रधानांचे लक्ष ‘स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी’कडे
पण भारताच्या जवानाने फबाओच्या डोक्यावर प्रहार केला त्यात तो जबर जखमी झाला. त्यानंतर होंगजुन आणि चेन यांनाही भारतीय जवानांनी रोखले. हा सगळा प्रकार रेकॉर्ड करणाऱ्या चीनच्या एका जवानाला भारतीय जवानांनी झोडपून काढले त्यात त्याचा अंत झाला. आपल्या जवानांचे मृतदेह पाहून चीनचे जवान माघार घेऊ लागले. तेव्हा वांग झुओरन याने आपल्या जवानांना घेऊन पळ काढला. ते करताना त्यांनी बर्फासारखी थंड गलवान नदी ओलांडण्याचा प्रयत्न केला. त्यात चार जवानांना वांगने नदीच्या पलिकडे ढकलले पण त्याचे पाय दगडांत अडकले आणि तो वाहून गेला. असे एकूण ३८ जवान नदीतून वाहून गेले. त्यानंतर चीनच्या रागावलेल्या जवानांनी खिळे लावलेले सोटे, लोखंडी सळ्या, तारा लावलेल्या काठ्या घेऊन भारतीय जवानांवर हल्ले केले. १९९६ झालेल्या करारानुसार अशा प्रकारची शस्त्रे कुणीही वापरायची नाहीत, असे निश्चित झालेले असतानाही चीनने तो करार मोडीत काढला.
त्यावेळी केंद्रीय मंत्री व माजी सेनादल प्रमुख जनरल व्ही. के. सिंग यांनी चीनचे दुप्पट जवान मृत्युमुखी पडल्याचा दावा केला होता. पण त्यांचा दावा खोटा असल्याचा प्रचार भारतातील विरोधकांनी केला.