पाकिस्तानला चिनी कंपन्यांनी थेट धमकी दिली आहे. पाकिस्तानने थकीत बिल तब्बल ३०० अब्ज डॉलर जर दिल नाही तर चिनी कंपन्या पाकिस्तानची बत्ती गुल करतील असा इशारा त्यांना दिला आहे. पाकिस्तान अनेक दिवसांपासून आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. आता चीनने घेतलेल्या या भूमिकेमुळे पाकिस्तानला धक्का बसला आहे.
पाकिस्तानने चिनी कंपन्यांची जवळपास ३०० अब्जांहून अधिक रक्कम देणे बाकी आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत पाकिस्तनाने ही रक्कम न दिल्यास पाकिस्तानचे पावर प्लांट चीनला बंद करावे लागतील, असे चिनी कंपन्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
चायना-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (CPEC) अंतर्गत तीस चीनी कंपन्या पाकिस्तानमध्ये कार्यरत आहेत. या तीस चिनी कंपन्यांचा पाकिस्तानच्या ऊर्जा, दळणवळण, रेल्वे आणि इतर क्षेत्रांमध्ये त्यांचा मोठ्या प्रमाणात दबदबा आहे. सोमवार, ९ मे रोजी पाकिस्तानचे नियोजन आणि विकास मंत्री अहसान इक्बाल यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली. या बैठकीत चिनी कंपन्यांच्या थकीत रकमेबाबत विचारणा करण्यात आली. चीनने घेतलेल्या या भूमिकेमुळे पाकिस्तनाला धक्का बसला आहे.
हे ही वाचा:
कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणातील आरोपींसाठी पुन्हा सरसावले शरद पवार
संगीताचा ‘अंतर्ध्वनी’ टिपणारा संगीतपूजक
कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणातील आरोपींसाठी पुन्हा सरसावले शरद पवार
नाना पटोलेही करणार अयोध्या वारी
दरम्यान, चीनी कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसोबत पार पडलेल्या बैठकीत मंत्री इक्बाल यांच्याकडून उद्भवलेल्या प्रश्नाची दखल घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच संबंधित अधिकार्यांना संपूर्ण प्रकरणाची माहिती देण्यास आणि त्वरित पैसे देण्याची व्यवस्था करण्यास सांगितले आहे. या महिनाभरात त्यांची आर्थिक अडचण दूर केली जाईल, असे आश्वासन इक्बाल यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले आहे.