….म्हणून चीनने केले भारताचे कौतुक

….म्हणून चीनने केले भारताचे कौतुक

श्रीलंका अनेक महिन्यांपासून आर्थिक संकटाचा सामना करत आहे. भारत वारंवार श्रीलंकेला या आर्थिक संकटातून बाहेर येण्यासाठी मदत करत आहे. त्यामुळे भारत श्रीलंकेला करत असलेल्या मदतीचे चीनने कौतुक केले आहे. तसेच श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी देखील हेच नमूद केले की, भारताशिवाय तेलखरेदीला त्यांना कोणीही मदत केलेली नाही.

चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांची बुधवार,८ जून रोजी पत्रकार परिषद झाली. त्यावेळी त्यांनी या परिषदेत भारताचे कौतुक केले आहे. ते म्हणाले, आम्ही हे पाहिले आहे की भारत सरकारने श्रीलंकेला बरीच मदत केली आहे. जेव्हा श्रीलंका सर्वात वाईट आर्थिक संकटाचा सामना करत आहे, तेव्हा अनेकांना मदत करण्यास संकोच वाटत होता. मात्र भारताने श्रीलंकेला वेळोवेळी मदत केली आहे, असे ते म्हणाले.

भारताने श्रीलंकेला आतापर्यंत अन्न, औषध आणि इंधनासाठी ३.५ अब्ज डॉलरची आर्थिक मदत दिली आहे. श्रीलंका दिवाळखोरीच्या मार्गावर आहे आणि अन्न, इंधन, औषधे आणि स्वयंपाकाच्या गॅसपासून टॉयलेट पेपर आणि माचिसच्या कांड्यांपर्यंत जीवनावश्यक वस्तूंच्या तीव्र टंचाईशी झुंजत आहे. गेल्या काही महिन्यांपासून लोकांना मर्यादित स्टॉक खरेदी करण्यासाठी लांबच लांब रांगेत उभे राहावे लागत आहे. श्रीलंकेने आयएमएफला सांगितले आहे की, केवळ भारतच मदत करत आहे.

हे ही वाचा:

‘मुख्यमंत्र्यांचे भाषण एमआयएमची मतं मिळवण्यासाठी’

राजीव गांधींचा ‘तो’ फोटो काढणाऱ्या छायाचित्रकाराचे निधन

रोजीरोटी देईन, पाणी, रस्ते देईन तेव्हाच संभाजीनगर नाव होईल!

उत्तर प्रदेशच्या शाळेमध्ये मराठी शिकवली जाणार?

पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी आयएमएफ प्रमुख क्रिस्टालियाना जॉर्जिव्हा यांना श्रीलंकेसाठी लवकरच मदत कार्यक्रम लागू करण्याचे आवाहन केले आहे. त्याचवेळी त्यांनी हे आवर्जून सांगितले की, या संकटाच्या काळात भारताशिवाय कोणताही देश तेल खरेदीसाठी पैसा देत नाही. दरम्यान, चीनने श्रीलंकेला अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी पाचशे दशलक्ष आरएमबीची मदत जाहीर केली आहे.

Exit mobile version