या वर्षी पहिल्यांदाच मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात लहान मुलांचाही सहभाग असणार आहे. १७ व्या मुंबई अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात १८ वर्षांखालील मुलेही भाग घेणार आहेत. माहितीपट आणि ॲनीमेशनपट यांना समर्पित असलेला हा चित्रपट महोत्सव दक्षिण आशियातल्या सर्वात जुन्या आणि मोठ्या महोत्सवांपैकी एक आहे. या महोत्सवात मुलांना दोन मास्टर क्लास ॲनिमेशन चित्रपट ‘रामायण: द लीजंड्स ऑफ प्रिन्स राम’ आणि ‘मायटी लिटल भीम: आय लव्ह ताज महाल’ बघण्याची सुवर्णसंधी लाभणार आहे. मुंबईत २७ मे ते ४ जून, २०२२ दरम्यान १७ व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होत आहे.
या दोन्ही ॲनिमेशन चित्रपटांना सर्वांना प्रवेश विनामूल्य आहे. ज्यांनी MIFF प्रतिनिधी म्हणून नोंदणी केली नसेल त्यांनाही हे शो बघणे शक्य होणार आहे. या महोत्सवात लहान मुलांना फिल्म्स डिविजन इथे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला भेट देण्याची आणि चित्रपट क्षेत्रातील तज्ञांशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे.
हे ही वाचा:
पंतप्रधान मोदी साधणार अनाथ मुलांशी संवाद
‘रोहित पवारांनी असले धंदे बंद करावेत’
पंतप्रधान मोदींनी सांगितली ही योग दिनाची थीम
‘ह्या’ राज्यात आहे देशातील सर्वात जास्त सोन्याचा साठा
‘रामायण: द लीजंड्स ऑफ प्रिन्स राम’ ३१ मे २०२२ रोजी दुपारी ३.४५ वाजता जी. बी प्रेक्षागृह, फिल्म्स डिविजन कॉम्प्लेक्स इथे दाखवला जाईल. त्याच प्रमाणे ‘मायटी लिटल भीम: आय लव्ह ताज महाल’ हा चित्रपट ३० मे २०२२ रोजी दुपारी ३.४५ वाजता ऑडी – II, फिल्म्स डिविजन येथे दाखविला जाईल.