पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवांची बदली

पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवांची बदली

ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय मानले जाणारे आयएएस अधिकारी आणि पश्चिम बंगालचे मुख्य सचिव असणारे अल्पन बंडोपाध्याय यांची बदली झाली आहे. शुक्रवार, २८ मे रोजी केंद्र सरकार कडून यासंबंधीचे पत्रक काढून आदेश जारी करण्यात आले आहेत. ३१ मे ला सकाळी १० पर्यंत अल्पन यांना नव्या कामाच्या ठिकाणी रुजू व्हायचे आहे.

पश्चिम बंगालचे मुख्य सचिव अल्पन बंडोपाध्याय यांना केंद्र सरकारच्या कर्मचारी आणि प्रशिक्षण विभागात बदली करून पाठवण्यात आले आहे. अल्पन बंडोपाध्याय हे पश्चिम बंगाल सरकारचे मुख्य सचिव असून त्यांचा कार्यकाळ समाप्त होत होता. पण त्यांचा कोविड हाताळणीचा अनुभव बघता त्यांना मुदतवाढ मिळावी अशा प्रकारचे निवेदन पश्चिम बंगाल सरकारतर्फे देण्यात आले होते. त्यानुसार बंडोपध्याय यांना तीन महिन्याची मुदतवाढ दिली असल्याचे सांगण्यात येत होते. पण २८ मे रोजी केंद्र सरकार आदेशानुसार बंडोपाध्याय यांची बदली झाल्याचे स्पष्ट होत आहे. बंडोपाध्याय हे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय मानले जातात.

हे ही वाचा:

पश्चिम बंगालच्या मदतीसाठी धावलेल्या पंतप्रधानांचा ममता दीदींकडून अपमान

बॉलीवूडला पडली वीर सावरकरांची भुरळ, लवकरच येणार बायोपिक

‘मोदी सरकारची प्रतिमा मलिन करण्यासाठी भारतात राजकीय कुरघोडी’

सुशांतसिंह राजपूत प्रकरणात सिद्धार्थ पिठाणीला अटक

पश्चिम बंगालची निवडणूक झाली असली तरीही भाजपा विरुद्ध तृणमूल हा सामना नियमितपणे पाहायला मिळत आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या आल्या दिवशी भारतीय जनता पार्टी विरोधात वेगवेगळ्या कारणांवरून मोर्चा उडताना दिसत आहेत. याचाच प्रत्यय २८ मे, शुक्रवारी ‘यास’ या चक्रीवादळाचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान मोदी हे पश्चिम बंगालमध्ये आले होते. पण ममता बॅनर्जी यांनी आपल्या मुख्य सचिवांच्या समवेत मोदींना अर्धा तास ताटकळत ठेवले. या चक्रीवादळाच्या आढावा बैठकीला त्या आल्याच नाहीत त्यांनी फक्त उपस्थिती लावून मोदींसोबत पंधरा मिनिटाची चर्चा करण्याची औपचारिकता दाखवली. मी तुम्हाला भेटायला इथे आले आहे. मुख्य सचिवांना आणि मला तुम्हाला एक निवेदन द्यायचे आहे असे म्हणत ममता बॅनर्जी यांनी मोदींकडे एक निवेदन सादर केले. त्यानंतर पुढील काही कार्यक्रम लागले असल्याचे सांगत त्यांनी बैठकीतून काढता पाय घेतला. या घटनेनंतर पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवांची बदली झाल्यामुळे यावरून अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.

Exit mobile version