मुंबईतील खड्डे बुजवण्याचे काम २४ तास सुरू ठेवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुंबईतील खड्डे बुजवण्याचे काम २४ तास सुरू ठेवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

अतिवृष्टीमुळे मुंबईतील रस्त्यांवरच्या खड्ड्यांचे प्रमाण वाढू लागले आहेत. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खड्डे बुजवण्याचे एमएमआरडीए आणि एमएसआरडीसी या दोन यंत्रणांनी स्वत्रंत अधिकारी नेमावेत असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी शनिवारी दिले आहेत. उत्तम दर्जाची सामुग्री वापरून ‘रेडीमिक्स’ पद्धतीने खड्डे भरण्यात यावेत. रस्ते कोणत्या यंत्रणेच्या अंतर्गत येतात हे न पाहता रस्त्यावरील खड्डे भरण्याचे आदेश, नियुक्त अधिकाऱ्यांच्या देखरेखेखाली खड्डे बुजवण्याचे काम २४ तास चालू राहील, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

एमएमआर क्षेत्रातील मुंबई शहरासह, ठाणे, नवी मुंबई तसेच शीळ फाटा, कल्याण-डोंबिवली, मिरा-भाईंदर, उल्हासनगर, भिवंडी अशा सर्वच परिसरातील वाहतूक कोंडीच्या समस्येवर कायमस्वरुपी अशा उपाय योजना करण्याबाबत प्रयत्न व्हावेत, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. तसेच त्यासाठीचा खर्च संबंधित यंत्रणेकडून घेण्यात यावा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या.

ठाणे जिल्हा आणि परिसरातील वाहतूक कोंडी आणि रस्त्यावरील खड्यांसंदर्भात सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे बैठक झाली. रस्त्यांवरील खड्डे आणि आणि वाहतूक कोंडीच्या उपाययोजनांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, वेळेत आणि चांगल्या पद्धतीने रस्त्यांवरील खड्डे बुजवले जातील याची काळजी घ्या. पोलिसांनीही ह्या यंत्रणेच्या संपर्कात राहून खड्डेमुक्त करण्यासाठी प्रयत्न करावेत. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, एमएमआर क्षेत्रातील वाहतूक कोंडी दूर व्हावी यासाठी रस्तेविकास प्रकल्प राबवण्यात यावे. त्यासाठी दीर्घकालीन योजना राबवणे, बायपास फ्ल्योव्हर, अंडरपास सर्व्हिस रोड अशा सर्व प्रकारच्या रत्यांसाठी तज्ञांकडून मार्गदर्शक आराखडा तयार करून घ्यावा. यासाठी आवश्यक तेथे भूसंपादन आणि स्थानिक मुद्दे विचारात घेऊन महानगरपालिक, जिल्हाधिकारी आणि आयुक्तांनी सहकार्य करावे, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यानी दिल्या आहेत.

हे ही वाचा:

“संजय राऊतांनी शांततेचा पवित्रा घेऊन शिंदे- ठाकरेंना एकत्र आणावं”

इंडिगो विमानाचे कराचीत इमर्जन्सी लँडिंग

इंडोनेशियामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दहा जणांचा मृत्यू

ठाणे शहराला अतिरिक्त पाण्यासाठी मंजुरी

एमएमआर क्षेत्रातील मुंबई शहरासह, ठाणे, नवी मुंबई तसेच शीळ फाटा, कल्याण-डोंबिवली, मिरा-भाईंदर, उल्हासनगर, भिवंडी अशाच सर्वच परिसरातील वाहतूक कोंडीच्या समस्येवर कायमस्वरुपी अशा उपाय योजना करण्याबाबत प्रयत्न व्हावेत, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

Exit mobile version