गेल्या पाच वर्षात त्रिपुरातील डबल इंजिन सरकारने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या सरकारमुळे प्रत्येक नागरिकांच्या जीवनात बदल झालेला दिसून येत आहे असे प्रतिपादन उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले आहे. आज सात फेब्रुवारीला बागबासा राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर सभेला योगी आदित्यनाथ संबोधित करत असताना म्हणाले कि, त्रिपुरातील जनतेने पाच वर्ष राज्याचा विकास बघितला आहे. आज काँग्रेस डाव्यांशी मिळून निवडणूक लढवण्यास आली आहे. आपण सतर्क राहावे हीच ती काँग्रेस आहे जी भगवान श्री रामाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असून राम मंदिर उभारणीला विरोध करत आहे.
आत्ताच्या सरकारने त्रिपुरात आपला मूळ मंत्र सबका साथ सबका विकास करून दाखवला आहे. प्रधानमंत्री योजनेमध्ये एकूण तीन लाख घरे , प्रत्येक घरात शौचालय , प्रत्येक कुटुंबात स्वयंपाकासाठी गॅस , प्रत्येक घरात नळ उपलब्ध केला असून बहुतेक सर्व गावांमध्ये पिण्याचे शुद्ध , स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. पुढे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, त्रिपुरातील जनतेने दीर्घकाळ कम्युनिस्ट राजवट आपण बघितली आहे. त्यात प्रामुख्याने अराजकता, गुंडगिरी आपण सहन केली. पाच वर्षापर्यंत त्रिपुरातील कितीतरी तरुण बेरोजगार होते तर महिलांच्या सुरक्षेचे संकट सुद्धा होते. गेल्या पाच वर्षात सुशासनाचा परिणाम दिसून आला.
हे ही वाचा:
अमेरिकेने फोडला चीनचा फुगा; चीनने व्यक्त केला संताप
श्रीराम आणि सीतामाईना मूर्त स्वरूप देणारे मराठमोळे हात
पुणेकर लवकरच घेणार डबलडेकर प्रवासाचा आनंद
आशियातला पहिला हेलिकॉप्टर कारखाना बनवण्याचा बहुमान भारताला
आता या निवडणुकीत काँग्रेस आणि कोम्मुनिस्ट एकत्र आले आहेत. म्हणूनच आपण सतर्क राहणे गरजेचे आहे. पुढे योगी आदित्यनाथ असेही म्हणाले की, काँग्रेस ने देशावर अनेक वर्ष सत्ता करून त्या काळात जनतेला कोणतेच फायदे करू दिले नाहीत. तुमच्या विश्वासाबरोबर काँग्रेस खेळत असून भगवान श्रीरामाच्या मंदिर बांधण्यावर आणि प्रभू श्रीरामाच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित करत आहे. असा हल्लाबोल त्यांनी काँग्रेसवर केला आहे. यूपीए सरकारच्या काळात रोज एक भ्रष्टाचाराचा घोटाळा समोर येत होता. आज सुशासन आणि विकास होत आहे म्हणूनच काँग्रेसला वाईट वाटत आहे. आधी इकडे अनागोंदी चालू होती. मला विश्वास आहे, आपण भाजप पक्षाच्याच उमेदवाराला आशीर्वाद देऊन विजयी कराल.