दोन वर्षांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मंत्रालयाला भेट

दोन वर्षांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मंत्रालयाला भेट

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज, १३ एप्रिल रोजी मंत्रालयात दाखल झाले आहेत. तब्बल दोन वर्षानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मंत्रालयात दाखल झाले आहेत. सुरुवातीला कोरोना काळात आणि नंतर त्यांच्या प्रकृतीच्या कारणामुळे दोन वर्षे मुख्यमंत्री मंत्रालयात गेले नव्हते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रशासकीय कामांसाठी मंत्रालयात न गेल्यामुळे विरोधकांकडून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. तसेच अधिवेशनांमध्येही मुख्यमंत्री गैरहजर राहिल्यामुळे मुख्यमंत्री घराबाहेर पडतच नाहीत अशी टीका करण्यात आली होती. त्यानंतर आज दोन वर्षानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वर्षा बंगल्यावरून मंत्रालयात रवाना झाले आहेत.

कोरोना महामारीमुळे लादण्यात आलेल्या निर्बंधांमुळे उद्धव ठाकरे हे मंत्रालयात गेले नव्हते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांना मणका आणि मानेच्या स्नायूंचा त्रास सुरू झाला होता. काही दिवसांतच त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे हे कोणत्याही कार्यक्रमांना देखील उपस्थित राहत नव्हते. यावरून विरोधी पक्षातील नेत्यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडले होते.

हे ही वाचा:

गुणरत्ने सदावर्ते यांचा ताबा सातारा पोलीस घेणार

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील लीपिकाला गाडीने उडवले

संजय राऊत म्हणतात, शिवराळ भाषेत माझ्या वेदना

श्रीलंकेने स्वतःला केले दिवाळखोर घोषित!

दरम्यान मुख्यमंत्री यांच्या पक्षातील खासदारांनीच मुख्यमंत्री आम्हाला भेटत नसल्याची तक्रार केली होती. समस्या मांडण्यासाठी म्हणून उद्धव ठाकरे आम्हाला वेळ देत नाहीत, असे काही शिवसेना खासदारांचे म्हणणे होते.

Exit mobile version