शिंदे- फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून सरकारने मोठे निर्णय घेण्याचा आणि स्थगित प्रकल्प मार्गी लावण्याचा धडाका लावला आहे. सत्तेतून पायउतार होताना ठाकरे सरकारने एकामागून एक नामांतराचे निर्णय घेतले. औरंगाबादचे नाव संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामांतर करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे सरकारने घेतलेल्या शेवटच्या मंत्रिमंडळातील निर्णयांना स्थगिती दिली आहे. त्यानंतर आज शिंदे- फडणवीस सरकारने नामांतराचा मोठा निर्णय घेतला आहे.
२९ जूनला ठाकरे सरकारने नामांतराचे निर्णय घेतले होते. मात्र, तेव्हा सरकार अल्प मतात होतं आणि पुढे जाऊन याबाबतील कायदेशीर पेच निर्माण होऊ नयेत म्हणून एकनाथ शिंदे यांनी या निर्णयांना स्थगिती दिली होती. त्यानंतर आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे नाव धाराशिव आणि नवी मुंबई विमानतळाचे नाव लोकनेते दि. बा. पाटील देण्यात येणार आहे. या संबंधीचा ठराव विधीमंडळात मंजूर केला जाईल आणि मग प्रस्ताव केंद्र सरकारकडे जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
हे ही वाचा:
‘आझादी का अमृत महोत्सव’ निमित्त ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाचे आयोजन
महाराष्ट्रात लख्ख ‘उजाला’; राज्यात २.२ कोटी एलईडी बल्बचे वितरण
नामांतराच्या निर्णयांना स्थगिती
एमएमआरडीए अंतर्गत विकासकामांसाठी ६० हजार कोटी रुपयांचे कर्ज उभारण्याला मंजुरी देण्यात आली असून पहिल्या टप्प्यात १२ हजार कोटी रुपयांना मान्याता देण्यात आली आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच लवकरच पालकमंत्र्यांची नियुक्ती करण्यात येईल आणि मंत्रिमंडळ नसले तरी निर्णय थांबलेले नाहीत, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.