लोकसभा निवडणुकीत एनडीएने बहुमत मिळवले असून त्यांनी नरेंद्र मोदी यांना आपला नेता म्हणून निवडले आहे. यानंतर नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होणार आहेत. अशातच शुक्रवार, ७ जून रोजी एनडीएच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत राजनाथ सिंह यांनी मांडलेल्या प्रस्तावाला पाठींबा देत सर्वच घटक पक्षांनी नरेंद्र मोदींच्या नावावर नेता म्हणून शिक्कामोर्तब केले.
भाजपाकडून या प्रस्तावाला नितीन गडकरी आणि अमित शहा यांनी मान्यता दिली. याशिवाय, नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू, अजित पवार, चिराग पासवान, एकनाथ शिंदे यांसारख्या आघाडीतील अनेक नेत्यांनी नरेंद्र मोदींचे कौतुक करणारा प्रस्ताव मंजूर केला.
यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, “नरेंद्र मोदी हे तळागाळातून येथे आले आहेत. प्रत्येकाच्या वेदना ते समजून घेत आहेत. निवडणुकीच्या वेळी जनतेने विकासाला महत्त्व दिले आहे. विरोधी पक्ष फक्त राजकारण करायचे, त्यांना घरी बसवले आहे. गेल्या १० वर्षात नरेंद्र मोदींनी देशाला खूप पुढे नेले आहे,” असे गौरवोद्गार एकनाथ शिंदे यांनी नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बोलताना काढले.
विशेष म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी कवितेच्या चार ओळी बोलून दाखविल्या. “मैं उस माटी का वृक्ष नहीं, जिसे नदियों ने सींचा है, बंजर माटी में पलकर मैंने, मृत्यु से जीवन खींचा है। मैं पत्थर पर लिखी इबारत हूं, शीशे से कब तक तोड़ोगे। मिटने वाला मैं नाम नहीं, तुम मुझको कब तक रोकोगे.” एकनाथ शिंदे यांनी ही कविता ऐकवताच उपस्थित सर्व सदस्यांनी बाकं वाजवत कवितेला दाद दिली.
हे ही वाचा:
संसदेतील घुसखोरीप्रकरणात हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल
‘ईव्हीएम’ जिवंत आहे की मेली?, मोदींचा इंडी आघाडीवर निशाणा!
एनडीएच्या बैठकीत नरेंद्र मोदी संविधानापुढे झाले नतमस्तक!
पाकिस्तानविरोधातील अमेरिकेच्या विजयाचा शिल्पकार; सौरभ नेत्रावलकर आहे तरी कोण?
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एनडीएचा नेता म्हणून घोषित केल्यानंतर एनडीएकडून राष्ट्रपतींना पाठिंब्याचे पत्र देखील सादर करण्यात आले आहे. ९ जून रोजी संध्याकाळी साडे सहा वाजता पंतप्रधान मोदी यांना शपथविधी होणार आहे.