‘हिऱ्यापोटी जन्मलेल्या गारगोट्यांना हिंदू म्हणवून घेण्याची लाज वाटते’

मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला

‘हिऱ्यापोटी जन्मलेल्या गारगोट्यांना हिंदू म्हणवून घेण्याची लाज वाटते’

शिवसेना शिंदे गटाचा आज दक्षिण मुंबईतील आझाद मैदानावर दसरा मेळावा पार पडला. शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यातून शिवसेना उबाठागटावर जोरदार हल्ला चढवला.जमलेल्या माझ्या तमाम हिंदूबांधवाना आणि भगिनीनो आणि बांधवानो, अशी गर्जना बाळासाहेब ठाकरे करताना सर्वांच्या अंगावर रोमांच उभे राहायचे. ‘गर्व से कहो हम हिंदू है’ ही गर्जना बाळासाहेबांनी संपूर्ण देशाला दिली. मात्र, काही लोकांना या शब्दाची एलर्जी झाली आहे, हिंदू म्हणून घेण्याची लाज वाटत आहे, हिंदू हृदय सम्राट म्हणण्याला काहींची जीभ कचरू लागली आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

आम्हाला हा शब्द उच्चारताना अभिमान नाहीतर स्वाभिमान वाटतो. पण हिऱ्यापोटी जन्माला आलेल्या गारगोट्यांना आता लाज वाटत आहे. बाळासाहेबांच्या विचारांशी बेईमानी करणाऱ्यांपासून शिवसेना मुक्त केली, त्यामुळे आजाद शिवसेनेचा हा आजाद मेळावा आहे. महाराष्ट्र विरोधी आघाडीला घरी पाठवून आपले सरकार आले, तेव्हा काहींनी म्हटले हे सरकार टिकणार लवकरच ढासळेल. मात्र, जनतेच्या आशीर्वादाने घासून-पुसून नाहीतर ठासून दोन वर्षे पूर्ण केली. मला हलक्यात घेवू नका, मी मैदानातून पळून जाणारा नसून पळवणारा आहे. कट्टर शिवसैनिक मैदान आणि विचारही सोडत नाही, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

ते पुढे म्हणाले, बाळासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे अन्याय होत असले तर उठाव करा, आम्ही उठाव केला. मविआचे सरकार होते तेव्हा महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर होते, आमच्या सरकारने सहा महिन्यात नंबर एकला आणले. कोविडला घाबरून घरात लपून बसलेला हा मुख्यमंत्री नाही, लोकांच्या मदतीसाठी थेट रस्त्यावर उतरणारा हा मुख्यमंत्री आहे. महाविकास आघाडीने सुरवातीच्या अडीच वर्षात ‘जिथे नाही ब्रोकर तिथे कामाच्या मार्गावर टाकले स्पीड ब्रेकर’, असे यांचे काम होते. यानंतर आम्ही या सरकारसह त्यांचे स्पीड ब्रेकरही उखडून टाकले. माझी दाढी विरोधकांना खुपते, होती दाढी म्हणून उध्वस्त केली महाविकास आघाडी, त्यामुळे महाराष्ट्र विकासाची वेगणे धावू लागली गाडी, असा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले.

हे ही वाचा : 

सत्तेत येताचं प्रत्येक जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर बांधणार

शमीच्या झाडावर ठेवलेली शस्त्रास्त्र काढा आणि वेध घ्या: राज ठाकरे

काँग्रेस आमदार सुलभा खोडके यांची पक्षातून हकालपट्टी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अथक परिश्रमाचं राज ठाकरेंकडून कौतुक

उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आम्ही उठाव केला नसता तर विकासाची कामे केवळ फेसबुक लाईव्ह झाले असते, आपण फेस-टू-फेस कामे करणारे आहोत. नेता घरात नाहीतर तो लोकांच्या दारात शोभून दिसतो, असे बाळासाहेब म्हणायचे आणि आम्ही तशी कामे करतोय. आम्ही हे सर्व शिकलो मात्र, ‘नर्मदेतील गोटे कोरडेच राहिले’. आमचा उठाव नसता तर सकाळी झाली ‘मोरू उठला आंघोळ केली आणि मोरू पुन्हा झोपला’, असे चित्र आज महाराष्ट्राचा समोर निर्माण झाले असते. आता हाच मोरू दिल्लीच्या गल्लीगल्लीमध्ये फिरतोय.

मुख्यमंत्री करा म्हणून दिल्लीच्या फेऱ्या मारत आहेत, मात्र त्यांच्या सहकाऱ्यांनाच मुख्यमंत्री म्हणून चेहरा पसंत नाही, तर महाराष्ट्राला कसा चालेल?, असा सवाल मुख्यमंत्री शिंदेनी उपस्थित केला. विरोधकांचा अजेंडा केवळ भष्ट्राचार, नेशन प्रथम हा आमचा अजेंडा. हरियाणा विधानसभेच्या निकालापूर्वी विरोधक जलेबी वाटत होते, मात्र निकाल समोर येताच तोंड लपून पळून गेले. अशीच पुनरावृत्ती महाराष्ट्रमध्ये होणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदेनी व्यक्त केला.

शिवसेनेच्या भगव्या रंगाचा रंग बदलण्याचा प्रयत्न केला, मात्र यांच्या चेहऱ्याचा रंग बदलला. काँग्रेसच्या व्होटबँक वर निवडून आले आहेत, ही एक सूज आहे, उतरल्याशिवाय राहणार नाही. बॉम्ब स्फोट मधला आरोपी इक्बाल मुसा, पाकिस्तानचा झेंडा यांच्या प्रचार फेरीत दिसतात. पाकिस्तानमध्ये यांचे बॅनर लागले, आता हे पाकिस्तानची बोली बोलू लागले आहेत. एमआयएम आणि उबाठा आता समानच आहेत. फेक नरेटिव्ह फोडून काढा, लोकसभेसारखे विधानसभेला गाफील राहू नका. आज दसरा असत्याचा-अहंकाराचा रावण आपल्या गाढून-जाळून टाकायचा आहे. त्यामुळे येणार आपला विजय भव्यदिव्य असला पाहिजे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले.

Exit mobile version