‘प्रकल्प होऊ नये म्हणून अनेकांनी प्रयत्न केले’

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य

‘प्रकल्प होऊ नये म्हणून अनेकांनी प्रयत्न केले’

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचं लोकार्पण करण्यात आलं आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सभास्थळी भाषण केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत. तसेच ठाकरे गटावर नाव न घेता टीका सुद्धा केली आहे.

आजचा दिवस आनंदाचा आहे. या मार्गाला आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिले आहे. त्याचा आम्हाला अभिमान वाटतो आहे. अनेक लोकांनी प्रकल्प होऊ नये म्हणून प्रयत्न केले परंतु आम्ही हा प्रकल्प पूर्ण करून दाखवला आहे. हा महामार्ग कमी वेळेत बनला आहे, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

पुढे एकनाथ शिंदे म्हणाले, मला आनंद याचा होतोय त्यावेळी माझ्यावर देवेंद्र फडणवीस यांनी विश्वास दाखवला. शेतकऱ्यांमध्ये आम्ही विश्वास निर्माण केला. सर्वात मोठे जमीन अधिग्रहणाचे काम आम्ही यशस्वीरित्या पूर्ण केले. शेतकऱ्यांना आरटीजीएसच्या माध्यमातून पैसे दिली आणि त्यांचा विश्वास जिंकला.

हा महामार्ग जगात नंबर एक बनला आहे. पंतप्रधान मोदी या लोकर्पणासाठी उपस्थित राहिले याचा मला अभिमान आहे, असंही एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. तसेच यावेळी एकनाथ शिंदे यांनी अनेक प्रकल्पांचा उल्लेख केला आहे. भारताच्या जी २० च्या अध्यक्षपचेसुद्धा त्यांनी उल्लेख केला आहे.

हे ही वाचा : 

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचं लोकार्पण

‘पंतप्रधान मोदी आणि एकनाथ शिंदे यांच्यामुळे समृद्धी महामार्ग’

‘मन की बात’ कार्यक्रमाचे पुस्तक छापण्यावरून लुबाडले

एका डेंटिस्टचे साखरपुड्याच्या दिवशी अपहरण

विदर्भाच्या विकासासाठी ‘समृद्धी’ आवश्यक

यासोबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, विदर्भाच्या विकासासाठी समृद्धी आवश्यक आहे. नागपूर ते पुणे हा रास्ता पण लवकरच होईल. नागपूर ते पुणे सहा तासात पोहोचणार आहे. त्याचबरोबर आम्ही आणखी सहा रास्ते बनवत आहोत. हैदराबाद, पुणे, औरंगाबाद, चेन्नई असे अनेक महामार्ग लवकरच तयार होईल. नागपूरवरून इतर शहरांना जोडणारे मार्ग लवकरच सुरू होतील, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले आहेत.

Exit mobile version