मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले स्पष्टीकरण
राज्यपाल यांनी केलेल्या वक्त्यव्यावर एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त असून, त्यांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. राज्यात शिंदे-फडणवीस सरकारबद्दल सकारात्मक चर्चा सुरू आहे. आम्ही जनतेच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. राज्यात पोलीस भरतीसुद्धा लवकरच निघणार आहे. जनतेच्या हिताचे सगळे निर्णय आम्ही घेतले आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. मालेगावमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कामाचा आढावा दिला आहे.
राज्यात जिथे अडचण आहे तिथे सरकार मदत करणार आहे. लोकहिताचे, शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय आम्ही घेत आहोत. पेट्रोल डिझेलचे भाव कमी करून सर्वसामान्य जनतेला दिलासा दिला आहे. शासन आपल्या दारी, असे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान झालं आहे. त्यांची भरपाई करणार आहोत. तातडीने यावर उपाय काढणार आहोत. महत्वाचं म्हणजे, आरोग्य, शिक्षण आणि रस्ते यावर लक्ष केंद्रित करणार असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
हे ही वाचा:
संजय राऊतांची शिवीगाळ करत असतानाची ऑडियो क्लिप व्हायरल
धनुष्यातील ‘बाणा’सोबत ‘अर्जुन’ही शिंदेंसोबत
राज्यात दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी
बाळासाहेबांचे नातू निहार ठाकरे एकनाथ शिंदे यांच्या बाजूने
जलद गतीने रखडलेले प्रकल्प पूर्ण करणार आहोत. एकंदरीत सर्व विभागांचा आढावा घेतला असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. दरम्यान, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या वक्त्यव्यावर एकनाथ शिंदे यांनी नाराजी दर्शवली आहे. ते म्हणाले, मुंबईच्या विकासात मराठी माणसाचं योगदान नाकारू शकत नाही. १०६ हुताम्यांमुळे मुंबई मिळाली आहे. बाळासाहेबांचं योगदान देखील यामध्ये मोठं आहे. मराठी माणसामुळे मुंबईच वैभव आहे. शिवसेना ही मराठी माणसाला न्याय देण्यासाठी स्थापन केली होती. करोडो लोकांना मुंबई रोजगार देते. मराठी माणसाच्या मेहनीतीवर मुंबई देशाची आर्थिक राजधानी बनली आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.