22 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरराजकारणमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता शिवसेनेचे मुख्य नेते; पक्षप्रमुखपदाची जागा रिकामी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता शिवसेनेचे मुख्य नेते; पक्षप्रमुखपदाची जागा रिकामी

Google News Follow

Related

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का दिला आहे. एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेची जुनी कार्यकारिणी बरखास्त करत नवीन कार्यकारिणी जाहीर करून मूळ शिवसेना आमचीच असल्याचा दावा आणखी मजबूत केला आहे. शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. परंतु हे करताना शिवसेना पक्ष प्रमुख पदाला त्यांनी हात लावलेला नाही.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर शिंदे गटातील आमदारांची बैठक साेमवारी ट्रायडंट हॉटेलमध्ये झाली. आजच्या बैठकीत शिंदे गट ठराव मांडून नवीन कार्यकारिणीची घोषणा केली. शिवसेनेच्या १९ खासदारांपैकी १३ खासदारांनी या बैठकीला ऑनलाइन उपस्थिती लावली होती. हाेती शिवसेनेच्या ५५ आमदारांपैकी ४० आमदार हे एकनाथ शिंदेंच्या सोबत आधीच गेले आहेत. त्यामुळे शिवसेनेचे हे १४ खासदार शिंदे गटात सामिल होणार असल्याची चर्चाही गेल्या काही दिवसांपासून सुरू हाेती.

शिवेसेनेला साेडचिठ्ठी देण्याचे धक्कातंत्र कायम ठेवताना माजी मंत्री रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्या कामकाजावर टीका करत साेमवारी नेतेपदाचा राजीनामा दिला व ते शिंदे गटात सामील झाले. पक्षविरोधी कारवाई केल्याच्या कारणाखाली या दोघांचीही शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. नव्या कार्यकारीणीमध्ये रामदास कदम यांच्यासह आनंदराव अडसूळ यांच्यावर नेतेपदाची जबाबदारी साेपवण्यात असून आमदार दीपक केसरकर यांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे.

आमदारांपाठाेपाठ आता आता खासदारांपासून ते स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते माेठ्या संख्येने शिंदे गटात सहभागी हाेत आहे. मंगळवारी ठाण्यातील युवासेनेही मंगळवारी शिंदे गटात प्रवेश करून जाेरदार शक्तीप्रदर्शन केले. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा खरी शिवसेना आमचीच असल्याच्या दाव्याला आणखी पाठबळ मिळत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

हे ही वाचा:

“सभागृह म्हणजे लोकशाहीचं तीर्थक्षेत्र”

भाजपा महिला मोर्चाच्या पदाधिकारी सुल्ताना खान यांच्यावर हल्ला

अमेरिकेतील इंडियाना स्टेट मॉलमधल्या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू

१६व्या राष्ट्रपतीपदासाठी आज मतदान

शिवसेनेत फूट निश्चित
मुख्यमंत्री शिंदे मंगळवारी मंत्रिमंडळ विस्तारासाठी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र माेदी यांची भेट घेण्यासाठी जाणार आहेत. त्यांच्यासाेबत शिंदे गटात आलेले नवीन खासदारही साेबत असतील. त्यामुळे शिवसेनेच्या खासदारांमध्येही फूट पडण्याची शक्यता आहे. शिवसेना राष्ट्रीय पातळीवर फुटणार असे चित्र जवळपास निश्चित झालं असून ते बुधवारी खऱ्या अर्थाने स्पष्ट हाेऊ शकेल.

अशी आहे नवीन कार्यकारीणी
नेते : रामदास कदम, आनंदराव अडसूळ

उपनेते : यशवंत जाधव, गुलाबराव पाटील, उदय सामंत, शरद पोंक्षे, तानाजी सावंत,विजय नहाटा, शिवाजीराव अढळराव पाटील.

लोकसभेतील शिवसेनेचे नेते : राहुल शेवाळ

प्रवक्ते : दीपक केसरकर

प्रतोद : भावना गवळी (शक्यता)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा