मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज नंदुरबार दौऱ्यावर होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नंदुरबार नगरपरिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण केले आहे. यावेळी त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात खास अहिराणी भाषेतून केली. राम, राम जय खान्देश असे उद्गार काढताच उपस्थितांनी टाळ्या वाजवत प्रतिसाद दिला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज, २९ ऑक्टोबर रोजी पहिल्यांदा नंदुरबार दौऱ्यावर गेले होते. यावेळी त्यांनी नंदूरबार नगरपरिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण केले. या लोकार्पण सोहळ्यात बोलताना शिंदे यांनी राज्य सरकारच्या विकास योजनांची माहिती दिली. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, २०१९ सालीचं शिवसेना भाजपाचे सरकार यायला हवे होते. तेच सरकार राज्यात तीन महिन्यापूर्वी आले. हे जनतेच्या मनातील सरकार आहे. गेल्या अडीच वर्षपासून राज्यातील विकासकामांची गती मंदावली होती. त्या विकासकामांना गती देण्याचे काम आमच्या सरकरांकडून केले जातं आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना २०१४ ते २०१९ या काळात अनेक मोठे प्रकल्प सुरू झाले. पण दुर्दैवाने करोना तसेच इतर कारणांमुळे ही कामे नंतर थांबली होती. या कामांना चालना देण्याचे काम आम्ही केले. गेल्या तीन ते चार महिन्यांत आपण मोठे निर्णय घेतले, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
हे ही वाचा:
सावधान! सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सबाबत केंद्राचे नवे नियम
कॉमेडियन भारती सिंगविरोधात ड्रग्ज प्रकरणी आरोपपत्र दाखल
मिलिंद नार्वेकर यांच्या सुरक्षेत वाढ
बिहारमध्ये गॅस सिलिंडरचा मोठा स्फोट, सात पोलिसांसह ३० जखमी
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांचं प्रोत्साहनपर अनुदान देण्यात आले. पेट्रोल कमी करून जनतेला दिलासा दिला. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना तत्काळ मदतीचे वाटप करण्यात आले. शेतकऱ्यांच्या खात्यात अडीच हजार कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. तसेच यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे नाव न घेता निशाणा साधला. काही लोक बांधावर जात आहेत. ठीक आहे गेले पाहिजे. शेवटी काम तर करायलाच पाहिजे, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.