काँग्रेस पाकिस्तानची भाषा बोलत आहे. भाकरी भारताची खातात आणि चाकरी पाकिस्तानची करतात. शहिदांचा अपमान करणे आणि कसाबची बाजू घेणे हा काँग्रेसचा देशद्रोहीपणा आहे. बाळासाहेबांचा वारसा सांगणाऱ्या उबाठांना काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसताना मनाची नाही तर जनाची लाज वाटायला हवी होती, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.पालघर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉ. हेमंत सावरा यांच्या प्रचारासाठी आज (१३ मे) वसईत आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री बोलत होते.
तीन वर्षांपूर्वी पालघरमध्ये साधू हत्याकांड झाले होते. त्या खटल्यात महाविकास आघाडी सरकारने आरोपींना पाठिशी घालून न्याय दिला नाही. मात्र महायुतीचे सरकार आल्यानंतर एकाही साधू संतांना हात लावण्याची हिम्मत कोणी करू शकणार नाही, असे काम सरकारने केल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, काश्मीरमध्ये कलम- ३७० हटवले तेव्हा राहुल गांधी यांनी रक्ताचे पाट वाहतील असे म्हटले होते. मात्र गृहमंत्री अमित शहा यांनी राहुल गांधी आणि दहशतवादाची बोलती बंद करून टाकली. काश्मिर मोकळा श्वास घेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या सहकार्यामुळे लाल चौकात तिरंगा फडकला आहे.
हे ही वाचा:
एस जयशंकर यांचा अमेरिकेबद्दल मांडलेल्या परखड मताचा व्हिडीओ चीनच्या राजदूतांनी केला शेअर
‘घाटकोपर दुर्घटनेची उच्चस्तरिय चौकशी करण्याचे आदेश’
‘पावसामुळे घटकोपरमध्ये होर्डिंग कोसळले; अनेक गाड्या, लोक दबल्याची भीती’
बीडमध्ये होणार पवारांच्या जातवादी राजकारणाची अखेर
अयोध्येमध्ये राम मंदिरांचे ५०० वर्षांपासूनचे भारतीयांचे स्वप्न होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे स्वप्न पूर्ण केले. त्यामुळे आपण जय श्रीराम बोलतो. पण विरोधकांना याची पोटदुखी झाली असल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.मशालीने आग लावण्याचे उद्योग पालघरमध्ये सुरू आहेत. येत्या ४ जून रोजी विरोधकांची तोंडे कायमची बंद करा, असे मतदारांना आवाहन मुख्यमंत्री शिंदेनी केले.