राजस्थानच्या राजकारणात सध्या गदारोळ माजला असून काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीतून मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे माघार घेण्याची शक्यता आहे. अशोक गेहलोत हे काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरणार नाहीत, अशी माहिती आता समोर येत आहे.
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडीवरून राजस्थानमध्ये राजकीय वादळ निर्माण झाले आहे. राजस्थानमध्ये अशोक गेहलोत विरुद्ध सचिन पायलट संघर्ष पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्रीपदी सचिन पायलट यांची निवड करण्याचा श्रेष्ठींचा विचार आहे. राजस्थानची गादी सचिन पायलटक यांच्याकडे सोपवण्याच्या हायकमांडच्या निर्णयाविरोधात गेहलोत गटाने बंडखोरी दर्शवली आहे. पायलट यांना मुख्यमंत्रीपद मिळू नये यासाठी ही मागणी कायम ठेवून गेहलोत गटाच्या ८० हुन अधिक आमदारांनी राजीनामे दिले आहेत.
मात्र, त्यानंतर आता गेहलोत हे माघार घेत असल्याच्या चर्चा आहेत. अनेक राज्यांमध्ये गळती लागलेल्या काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या चर्चा होत असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘वन मॅन वन पोस्ट’ला पाठींबा दर्शवला होता. त्यामुळे त्यांचा हा पाठींबा म्हणजे राहुल गांधी यांनी अशोक गेहलोत यांना मोठा इशारा दिल्याचे म्हटले जात होते.
हे ही वाचा:
PFI च्या निशाण्यावर होते संघाचे मुख्यालय
रशियामध्ये शाळेत झालेल्या गोळीबारात सहा जणांचा मृत्यू
विद्यार्थ्यांची बस ५०० फूट दरीत कोसळली आणि
नवरात्रीसाठी बाजार फुलले, धारावीच्या कुंभारवाड्यात लगबग सुरू
अशोक गेहलोत यांचे नाव अध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर होते. शिवाय अशोक गेहलोत हे राजस्थानचे मुख्यमंत्री देखील असल्यामुळे त्यांना काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यास मुख्यमंत्रिपद सोडावे लागेल, असे संकेत राहुल गांधी यांनी दिले होते. त्यानंतर हा वाद सुरू झाला होता.