कोंबडी आणि दारूवाटप करून राष्ट्रीय ‘पार्टी’ची घोषणा

राष्ट्रीय पक्षाच्या घोषणेप्रित्यर्थ 'खास भेट'

कोंबडी आणि दारूवाटप करून राष्ट्रीय ‘पार्टी’ची घोषणा

भारतात निवडणुकीच्या अगोदर नेते स्थानिका मतदारांना खुश करण्यासाठी पैसे, कपडे, भेटवस्तू, अन्य-धान्य वाटताना आपण पाहिले आहे. मात्र तेलंगणाचे मुख्यमंत्री राष्ट्रीय पक्ष सुरू करणार आहेत. पण पक्ष स्थापन होण्यापूर्वीच तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) नेते राजनला श्रीहरी यांनी स्थानिक लोकांना मद्य आणि जीवंत कोंबडीचे वाटप करत असल्याचा व्हीडिओ समाजमाध्यमावर वायरल झाला आहे.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीवर लक्ष ठेवून, केसीआर दसऱ्याला त्यांच्या राष्ट्रीय पक्षाची घोषणा करण्यासाठी सज्ज आहेत. बुधवारी तेलंगणा भवन येथे टीआरएस विधिमंडळ पक्ष आणि राज्य कार्यकारिणी समितीची विस्तारित बैठक होणार आहे, ज्यामध्ये टीआरएस हे राष्ट्रीय पक्ष बनण्याबाबत प्रस्ताव मांडला जाईल. तसेच याला भारतीय राष्ट्र समिती किंवा बीआरएस म्हटले जाण्याची शक्यता आहे.

टीआरएसचे नाव बदलण्याचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात येणार आहे. राज्य मान्यताप्राप्त पक्ष म्हणून टीआरएस कोणत्याही राज्यात निवडणूक लढवू शकते. आगामी २०२४ च्या राष्ट्रीय निवडणुकीतील कामगिरीच्या आधारे, टीआरएस राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवू शकतो. दरम्यान, भाजपचे प्रवक्ते एनव्ही सुभाष यांनी श्रीहरीच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह निर्माण केले असून, दारू आणि जीवंत कोंबड्या वाटून मतदारांची दिशाभूल केली जात असल्याचे आरोप केले आहेत.

हे ही वाचा:

एकनाथ शिंदे यांच्या तिसऱ्या टिझरमध्ये ‘दहातोंडी रावण’

२४ वर्षांनंतर अनुकंपा तत्वावर नोकरी मागणाऱ्या तरुणीला फटकारले

पार्किंगमुळे शिंदे गटाला सर्वाधिक पाठिंबा असल्याचे संकेत

दसऱ्याआधीच महाराष्ट्राच्या खोखो संघांनी लुटले सोने

 

या व्हीडिओत हे स्पष्ट दिसते की, तिथे उभ्या असलेल्या नागरिकांना एकेक कोंबडी आणि दारुची एक छोटी बाटली भेट दिली जात आहे. त्यासाठी दारूच्या बाटल्यांचे खास रॅक आणले आहेत. केसीआर यांचे मोठे कटआऊट लावलेली गाडी तिथे उभी असून पुरुषांना हे गिफ्ट दिले जात आहे.

Exit mobile version