परमबीर सिंह वसुली प्रकरणात सॉफ्टवेअरमध्ये ‘छोटा शकील’

परमबीर सिंह वसुली प्रकरणात सॉफ्टवेअरमध्ये ‘छोटा शकील’

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह इतरांविरुद्ध दाखल झालेल्या खंडणीच्या गुन्ह्यात आता नवी माहिती समोर आली आहे. संजय पुनमियाने व्यावसायिक श्यामसुंदर अग्रवाल याला फसवण्यासाठी विशेष सॉफ्टवेअरद्वारे छोटा शकीलचा आवाज काढण्यात आला होता. तसेच हा फोन खरा वाटावा म्हणून व्हीपीएनचा वापर करण्यात आला, अशी माहिती चौकशी करणाऱ्या महाराष्ट्र राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या (CID) हाती लागली आहे.

या प्रकरणी संशय येऊ नये म्हणून सायबर तज्ज्ञाच्या मदतीने पुनमियाने हे संपूर्ण कृत्य केलं. या प्रकरणी सीआयडी तपास करत असून लवकरच आरोपपत्र दाखल करणार आहे. सीआयडीने संबंधित सायबर तज्ज्ञाचा जबाबही नोंदवून घेतला असून या सायबर तज्ज्ञाने या प्रकरणातील आरोपी आणि संशयितांना तांत्रिक मदत केल्याचा संशय आहे.

श्यामसुंदर अग्रवाल याने तक्रार दाखल केल्यानंतर परमबीर सिंह, संजय पनमिया, विकासक सुनील जैन, तसेच दोन एसीपी अधिकारी, एक डिसीपी आणि दोन पोलिस निरीक्षकांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलिसांनी पुनमिया आणि जैन यांना अटकही केली होती. या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर हे प्रकरण सीआयडीकडे सोपवण्यात आले. नंतर सीआयडीने पोलिस निरीक्षक नंदकुमार गोपाळे आणि आशा कोरके यांनाही अटक केली.

हे ही वाचा:

अर्थसंकल्पाविषयीचा हा इतिहास माहित आहे का? येथे वाचा सविस्तर

मलंगगडावर अनधिकृत मजार

पालिकेच्या विशेष सभेत कॉंग्रेसच्या नगरसेवकाचा धुआ, धुआ

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर मणिपूरमध्ये पहिली मालवाहू ट्रेन

परमबीर सिंह आणि त्यांच्या माणसांनी आपल्याला मकोका प्रकरणात अडकवल्याची तक्रार अग्रवाल याने केली होती. परमबीर सिंह हे अँटिलिया प्रकरणात अडकल्यानंतरच अग्रवाल यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडेही सिंह यांची तक्रार केली होती.

Exit mobile version