ब्राह्मणविरोधी वक्तव्याबद्दल छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांच्या वडिलांना अटक

ब्राह्मणविरोधी वक्तव्याबद्दल छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांच्या वडिलांना अटक

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे वडील नंदकुमार बघेल यांना ब्राह्मणांविरुद्ध अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी मंगळवारी अटक करण्यात आली आहे. रायपूर पोलिसांनी नंदकुमार बघेल यांना अटक केली आणि त्यांना न्यायालयात हजर केले. सध्या तिथे या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.

यापूर्वी ८६ वर्षीय नंदकुमार बघेल यांच्याविरोधात ब्राह्मणांविरुद्ध अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आला होता. त्यांच्या विरोधात ब्राह्मण समाजाने रायपूरच्या डीडी नगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. तक्रारीमध्ये, समुदायाने आरोप केला आहे की, नंदकुमार बघेल यांनी ब्राह्मणांचे वर्णन “बाहेरचे (परदेशी) असे केले आहे ज्यांनी एकतर सुधारणा करावी किंवा गंगेतून वोल्गाला जाण्यास तयार व्हावे”.

एका ब्रह्मन् समाजाच्या संघटनेने दिलेल्या तक्रारीनंतर येथील डी डी नगर पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा नंदकुमार बघेल (८६) विरोधात एफआयआर नोंदवला. शनिवारी, ब्राह्मण समाजाने एक रॅली काढून नंदकुमार बघेल यांच्यावर कारवाईची मागणी केली कारण भाजपाने मुख्यमंत्र्यांच्या विरोधात या मुद्द्यावर आपला जोर वाढवला.

हे ही वाचा:

काबूलमध्ये पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा

केंद्रीय मंत्र्याला अटक करतात पण माजी गृहमंत्री मात्र सापडत नाही

आता ‘या’ क्षेत्रातही होणार खाजगीकरण

५० कोटींचा दावा खुशाल टाकावा, मी घाबरत नाही

डीडी नगर पोलीस ठाण्याच्या प्रभारी योगिता खापर्डे म्हणाल्या, “नंदकुमार बघेल यांनी केलेल्या वक्तव्यावर ब्राह्मण समाजाने आक्षेप नोंदवला आणि समाजात तणाव निर्माण केल्याचा आणि समाजात द्वेष पसरवल्याचा आरोप करत पोलिसांकडे तक्रार केली.”

Exit mobile version