चक्क काँग्रेसचे मुख्यमंत्री भूपेश बघेल अदानींच्या फायद्यासाठी काम करतात!

राहुल गांधींनी आपल्याच मुख्यमंत्र्यांना आणले अडचणीत

चक्क काँग्रेसचे मुख्यमंत्री भूपेश बघेल अदानींच्या फायद्यासाठी काम करतात!

काँग्रेस नेते राहुल गांधी हे आपल्या विचित्र विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्या अशा विधानांचे असंख्य व्हीडिओ व्हायरल होत असतात. आता आणखी एक नवा व्हीडिओ व्हायरल झाला आहे. त्यात त्यांनी चक्क काँग्रेसच्याच मुख्यमंत्र्याला अडचणीत आणले आहे.

 

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी अदानी समूह आणि नरेंद्र मोदी सरकारवर हल्लाबोल करण्याचा प्रयत्न केला. रविवारी (२९ ऑक्टोबर) रोजी छत्तीसगडमधील राजनांदगाव येथे जाहीर सभेत राहुल गांधी म्हणाले की, या राज्याचे मुख्यमंत्री हे भारतीय उद्योगपती गौतम अदानींच्या फायद्यासाठी काम करत आहेत.मात्र, मोदी सरकारवर हल्ला करताना छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल हे काँग्रेसचेच आहेत हे राहुल गांधी विसरले. यावर भाजपचे प्रवक्ते अमित मालवीय यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला.

 

काँग्रेसचे राहुल गांधी यांचे हे विचित्र वक्तव्य एका सभेमध्ये समोर आले. छत्तीसगडमध्ये झालेल्या सभेमध्ये मोदी सरकारवर आणि अडाणी समूहावर आरोप करताना त्यांनी आपल्याच पक्षाच्या नेत्यावर आरोप केला. राहुल गांधी आपल्या सभेमध्ये म्हणाले, मोदी सरकार अदानी ग्रुपसाठी २४ तास काम करता. आणि या राज्यातील तुमचे मुख्यमंत्री (काँग्रेस नेते भूपेश बघेल यांचा संदर्भ देऊन) अदानींसाठी काम करतात,”असे भाष्य करत राहुल गांधींनी स्वतःची खिल्ली उडवली.राहुल गांधी यांच्या वक्तव्यानंतर भाजपचे प्रवक्ते अमित मालवीय यांनी काँग्रेसच्या वंशजांना फटकारण्याची एकही संधी सोडली नाही.

 

भाजपचे प्रवक्ते अमित मालवीय म्हणाले, “राहुल गांधी यांनी कबूल केले की, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल नेहमीच अदानींसाठी काम करतात. शेवटी, सत्य समोर येत आहे, की काँग्रेसनेच अदानी या कॉर्पोरेट समूहाला आश्रय दिला आहे, राहुल यांना टार्गेट करण्यात कंटाळा येत नाही. काय विनोद आहे तो!” त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

हे ही वाचा:

भिवंडीतील तीन गोदामांना भीषण आग!

उपमुख्यमंत्री अजित पवारांना डेंग्यूची लागण!

मरिन ड्राइव्हचे पारशी गेट जानेवारीला पुन्हा होणार स्थानापन्न

उद्योगपती मुकेश अंबानी यांना २४ तासांत दुसरा धमकीचा मेल

काँग्रेसने अदानी समूहाला अनेक कंत्राटे दिली

काँग्रेसने अदानी समूहाला दीर्घकाळ पाठिंबा दिला आहे. काँग्रेसचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या कारकिर्दीत भारतीय समूहाने राजस्थानमध्ये अनेक प्रकल्प मिळवले आहेत.अदानी समूहाकडून राजस्थानमध्ये पुढील ५-७ वर्षांत ६५,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे.महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात काँग्रेस पक्ष भागीदार होता, महाराष्ट्रातील दिघी बंदर प्रकल्प अदानी समूहामुळेच सुरक्षित करू शकला.

 

२०१५ मध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील केरळ सरकारने विझिंजम येथे नवीन बंदर विकसित करण्याचे कंत्राट अदानी समूहाला दिले. अदानी पोर्ट्सने लिलावात सर्वात कमी १,६३५ कोटी रुपयांचे अनुदान सादर केल्यामुळे व्हायबिलिटी गॅप फंडिंग (VGF) च्या वापराद्वारे हे कंत्राट देण्यात आले होते.संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) काळातही केंद्र सरकारने अदानी समूहाला २१,००० कोटी रुपयांचे १० प्रकल्प बहाल केले होते.

Exit mobile version