काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनीच आयोजित केला ‘द काश्मीर फाइल्स’चा शो

काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनीच आयोजित केला ‘द काश्मीर फाइल्स’चा शो

एकीकडे काश्मीर फाईल्स या चित्रपटाविरोधात काँग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून टीका होत असतानाच दुसरीकडे काँग्रेसचेच नेते या चित्रपटाचे कौतुक करताना दिसत आहेत. छत्तीसगड सरकारचे काँग्रेसचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी काश्मीर फाईल्स चित्रपटाचा एक विशेष शो आयोजित केला आहे.

काश्मिर फाईल्स चित्रपटाचा हा खास शो छत्तीसगडमधील विधीमंडळ सदस्यांसाठी तसेच काही विशेष निमंत्रितांसाठी आहे. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी स्वतः याबद्दल माहिती दिली आहे. या संदर्भात केलेल्या ट्विटमध्ये बघेल म्हणतात. “आज विधानसभेच्या सर्व सन्माननीय सदस्यांना (सत्ताधारी आणि विरोधी पक्ष) एकत्र काश्मीर फाईल्स बघण्यासाठी आमंत्रित केले आहे. आज रात्री ८ वाजता राजधानी मधील एका चित्रपटगृहात आम्ही सर्व आमदार आणि निमंत्रीत सदस्य एकत्र हा चित्रपट बघू.”

भूपेश बघेल यांचे हे ट्विट पाहून अनेकांना धक्का बसला आहे. एकीकडू समाज माध्यमांवर केरळ काँग्रेसने या चित्रपटा विरोधात एक भली मोठी पोस्ट लिहीली होती. पण त्याचा चित्रपटाच्या व्यवसायावर कोणताही परिणाम झालेला नाही. उलट काँग्रेसचेच नेते चित्रपटाचे कौतुक करताना दिसत आहेत.

विवेक अग्निहोत्री लिखित आणि दिग्दर्शित या चित्रपटात राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री पल्लवी जोशी, अनुपम खेर, प्रकाश बेलवाडी, मिथुन चक्रवर्ती, भाषा सुंबळी, दर्शन कुमार, चिन्मय मांडलेकर, पुनीत इस्सार, मृणाल कुलकर्णी, अतुल श्रीवास्तव आणि पृथ्वी सरनाविक यांनी काम केले आहे. बहुचर्चित असा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आहे.

हे ही वाचा:

मुंबई पोलिसांनी पारदर्शक भूमिका घेतली असती तर…

आसाम मधील सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार काश्मीर फाईल्स पाहण्यासाठी अर्ध्या दिवसांची सुट्टी

‘काश्मीर फाइल्स’चे तिकीट दाखवून पुण्यातील हॉटेलमध्ये जेवले १९०० ग्राहक

नवाब मलिकांना दणका; ईडी फराझ मलिकला तिसरं समन्स पाठवणार

या चित्रपटाला सुरुवातीला जास्त स्क्रीन्स आणि शो मिळाले नव्हते. त्यासोबतच सुपरस्टार प्रभासच्या ‘राधे श्याम’ चित्रपटाची या चित्रपटाला स्पर्धा होती. त्यासोबतच अमिताभ बच्चन यांचा ‘झुंड’ आणि आलिया भटचा ‘गंगुबाई काठियावाडी’ची पण स्पर्धा होती. तरीदेखील प्रेक्षकांनी ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट उचलून धरला. त्यामुळेच या चित्रपटाचे शो वाढवणे भाग पडले.

Exit mobile version