छत्रपती संभाजी राजे यांची राज्यसभा निवडणुकीतून माघार

छत्रपती संभाजी राजे यांची राज्यसभा निवडणुकीतून माघार

काही दिवसांपूर्वीच छत्रपती संभाजी राजे यांनी राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढवण्याची घोषणा केली होती. मात्र शुक्रवार, २७ मे रोजी संभाजी राजे यांनी पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत त्यांनी राज्यसभा निवडणुकीत उतरणार नसल्याचे जाहीर केले आहे. ते म्हणाले, मी निवडणूक लढवणार नसून, ही माझी माघार नसून स्वाभिमान आहे, असे संभाजी राजे म्हणाले आहेत.

छत्रपती संभाजी राजे म्हणाले, मला कोणत्याही पक्षाबद्दल द्वेष नाही पण मला अपक्ष निवडणूक लढवायची आहे. शिवसेनेबद्दल द्वेष नाही, पण मला शिवबंधनात अडकायचे नाही, असंही राजे म्हणाले आहेत. घोडेबाजार होऊ नये, म्हणूनही निवडणुकीतुन माघार घ्यायची आहे.

जनता हीच माझी खरी ताकद आहे. यापुढे माझ्या स्वराज्य संघटनेला मी बळकट करणार आहे. त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आणि विस्थापित मावळा संघटीत करणार, असा निर्धार संभाजीराजे छत्रपती यांनी केला आहे. मागील १५ ते २० वर्षात मी जनतेसाठी अहोरात्र काम केले आहे. यापुढेही अधिक बळकटीने हे काम पुढे नेणार असल्याचे संभाजीराजे छत्रपती म्हणाले आहेत.

हे ही वाचा:

मीठ म्हणून आणलेलं ५०० कोटींचे कोकेन जप्त

मोदी सरकारचे आठ वर्षात,आठ मोठे निर्णय

अभिनेत्री अमरीन भट यांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा

मीठ म्हणून आणलेलं ५०० कोटींचे कोकेन जप्त

दरम्यान, संभाजीराजे यांनी फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती. यामध्ये संभाजीराजे यांनी शिवसेनेच्या भूमिकेवषयी अप्रत्यक्षपणे का होईना, पण नाराजी व्यक्त केली आहे. तसेच मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नजरेतलं स्वराज्य घडवायचे आहे. मी त्यांच्या विचारांशी कटिबद्ध असेन. मी फक्त जनतेशी बांधील आहे, असे संभाजीराजे यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Exit mobile version