‘मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द मोडला’

‘मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द मोडला’

छत्रपती संभाजी राजे यांनी शुक्रवार, २७ मे रोजी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी परिषदेत राज्यसभा निवडणुकीत उतरणार नसल्याचे जाहीर केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द मोडला असल्याचे संभाजी राजे म्हणाले आहेत.

परिषदेत संभाजी राजे यांनी जनतेचे आभार मानले आहेत. ते म्हणाले, गेल्या १५ ते २० वर्षात अख्खा महाराष्ट्र मी पिंजून काढला. समाजाची भूमिका मांडली त्यावेळी जनतेने मला खूप प्रेम दिले त्यासाठी त्यांचे आभार. खासदारकीचा कार्यकाळ संपल्यानंतर पुढील राजकीय कार्यकाळ थोडा कठीण असेल, असंही संभाजी राजे म्हणाले आहेत.

संभाजी राजेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आवाहन दिले आहे. ते म्हणाले, आपण दोघे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावर जाऊन स्मरण करायचं करणं मी काही खोट बोललेलो नाही. त्यामुळे मी महाराजांच्या स्मारकावर जाण्यास तयार आहे. माझा स्वभाव असे बोलण्याचे नाही, मात्र मी खोटं बोलले नसल्याने

हे ही वाचा:

‘रिसॉर्ट परबांचे नाही मग त्यांनी कर का भरला?’

स्टेडियममध्ये कुत्रा फिरवणाऱ्या आयएएस अधिकाऱ्याला पाठवले लडाखला

अभिनेत्री अमरीन भट यांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा

मीठ म्हणून आणलेलं ५०० कोटींचे कोकेन जप्त

मला हे सर्व बोलावे लागत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन खासदार माझ्याकडे पाठवले, मला शिवसेना पक्षात सहभागी होण्यास सांगितले. पण मी स्पष्ट नकार दिला. त्यानंतर मला मुख्यमंत्र्यांनी स्वत: फोन करुन बोलावले. मला पुन्हा एकदा शिवसेनेत प्रवेश करण्यास सांगितले. त्यानंतर मी त्यांना एक प्रस्ताव दिला, मी अपक्ष निवडणूक लढवणार आहे. मला महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवारी द्यावी. मी त्यांना बोललो की तुम्ही विचार करा मीही करतो, त्यानंतर त्यांच्या मंत्र्यांचा फोन आला, बैठका झाल्या. शिष्टमंडळांच्या बैठका झाल्या. त्यांनी मला म्हटलं की शिवसेनेत प्रवेश करा. त्यांनी मला शब्द दिला. त्यानंतर मी कोल्हापूरला गेलो आणि बातमी आली की, त्यांनी संजय पवार यांना उमेदवारी जाहीर केली. हा काय प्रकार आहे म्हणून मी शिवसेनेच्या मंत्र्यांना फोन केला, मुख्यमंत्र्यांना फोन केला मात्र मला उत्तर मिळाले नाही. मुख्यमंत्र्यांनी मला दिलेला शब्द मोडला, असे संभाजी राजे म्हणाले.

Exit mobile version