महाराष्ट्र सदनातील खोलीत भुजबळ बंद!

महाराष्ट्र सदनातील खोलीत भुजबळ बंद!

राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे ओबीसी आरक्षण विषयी चर्चेसाठी दिल्लीला गेले होते. तेव्हा त्यांना महाराष्ट्र सदनाच्या इमारतीत काही वेळासाठी ताटकाळत राहावे लागले. दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील एका खोलीचे दार लॉक झाल्यामुळे त्यांना काही काळ सदनात ताटकाळत राहावे लागले.

गुरुवारी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात एका खोलीचे लॉक उघडत नव्हते. हे लॉक उघडेपर्यंत आणि दुरुस्ती करेपर्यंत अर्धा- पाऊण तास गेला. इतका वेळ भुजबळ यांना बाहेरच उभे राहावे लागले. सध्या राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी दिल्ली येथे गेलेले आहेत.

हे ही वाचा:

कोण आहेत जर्मनीचे नवे चॅन्सेलर?

३७० हटवल्यावर काश्मीरमधून हिंदू पळाले का? किती अतिरेकी मारले गेले?

भारतीय संघाची धुरा रोहित शर्माच्या खांद्यावर

राष्ट्रपती, पंतप्रधानांनी वाहिली बिपीन रावत यांना श्रद्धांजली

विशेष म्हणजे दिल्लीतील महाराष्ट्र सदन ज्यावेळी बांधले गेले त्यावेळी छगन भुजबळ हे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. त्यावेळी या प्रकल्पामध्ये आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यांना त्यावरून तब्बल वर्षभर तुरुंगवासही भोगावा लागला होता.  त्यानंतर आज त्याच सदनातील गैरकारभाराचा फटका स्वतः भुजबळांना बसल्याची चर्चा आहे.

ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. जाहीर झालेल्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुका एक तर संपूर्णपणे घ्या किंवा संपूर्णपणे थांबवा, अशी मागणी करत राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यासंदर्भात राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ हे दिल्लीत गेले आहेत.

Exit mobile version