राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात गोंधळ उडाला आहे. ब्राह्मण समाजाने वाईट वाटून घेऊ नये. पण, ब्राह्मण समाजात शिवाजी, संभाजी अशी नावे नसतात, असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी एका कार्यक्रमादरम्यान केले आहे.
काहींना सरस्वती आवडते तर काहींना शारदा आवडते. पण, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी महापुरुषांनीच आम्हाला शिक्षणाची दारे खुले केली आहेत, असं विधान छगन भुजबळ यांनी केलं आहे. काही लोक म्हणतात, तुम्ही इकडे- तिकडे गेलात. पण, कुठेही गेलो तरी, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा सोडणार नाही, असंही छगन भुजबळ म्हणाले आहेत. आम्हाला शिक्षण दिलं ते या महापुरुषांनी दिलं. त्यामुळे ते आमचे देव आहेत. ते तुमचेही देव असले पाहिजेत. कुणाच्या भावना दुखवायच्या नाहीत, असं छगन भुजबळ म्हणाले.
मी ब्राह्मणांवर टीका करत नाही. ब्राह्मण वर्ग सोडल्यास तुम्ही आम्ही शुद्र. त्यानंतर मग अतिशुद्र. शिक्षणाचा अधिकार ब्राह्मण वर्गातील फक्त पुरुषांना. महिलांनाही नाही. केवळ दीड टक्के लोकांपुरतेच शिक्षण मर्यादित होते, असंही छगन भुजबळ म्हणाले.
यावेळी त्यांनी संभाजी भिडे यांच्यावर टीका केली. त्यांचे नाव संभाजी भिडे नव्हे संभाजी कुलकर्णी आहे. ब्राह्मण समाजाने वाईट वाटू नये. ब्राह्मण समाजात संभाजी शिवाजी असे नाव ठेवत नाही. भिडे म्हणतो, माझ्या बागेतील अंबे खा, मुले होतील. मग मेडिकल कॉलेज कशाला? बाबासाहेबानी सांगितले शिक्षण घ्या, असं त्यांनी स्पष्ट केलं.
हे ही वाचा:
देवेंद्र फडणवीसांबद्दल खालच्या पातळीतील भाषा सहन करणार नाही
रतन टाटा महाराष्ट्राचे पहिले ‘उद्योगरत्न’
उद्धव ठाकरे, अहंकाराच्या नशेत झिंगून देवेंद्र फडणवीसांवर टीका करतायत
म्यानमारमध्ये पळालेले २१२ भारतीय परतले भारतीय लष्करामुळे मायदेशी
संभाजी भिडे यांचे नाव मनोहर कुलकर्णी असून, लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला जातो. खरेतर ब्राम्हण समाजाने वाईट वाटून घेऊन नये. पण, ब्राम्हण समाजात संभाजी, शिवाजी नाव ठेवत नाहीत. मात्र, मुद्दामन संभाजी भिडे हे नाव ठेवण्यात आले, अशी टीका छगन भुजबळ यांनी केली.