राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. भुजबळ यांनी एका कार्यक्रमात देवी सरस्वती संबंधी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. सरस्वतीने आम्हाला शिकवलं नाही मग शाळेत सरस्वतीची पूजा का करायची? असा वादग्रस्त प्रश्न छगन भुजबळ यांनी विचारला. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यक्रमात छगन भुजबळ बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केलं. ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी छगन भुजबळ यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे.
सत्यशोधक समाज शतकोत्तर सुवर्ण महोत्सव पार पडला. यावेळी छगन भुजबळ बोलत असताना त्यांनी शाळांमध्ये महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांचे फोटो लावा अशी मागणी केली. देवी सरस्वतीला कुणी पाहिले आहे का? पाहिले असेल तरी फक्त ३ टक्के लोकांना सरस्वती देवीने शिकवलं, असेल असं वादग्रस्त विधान त्यांनी केलं. शाळेत सरस्वती देवीची पूजा का करायची? सरस्वतीने आम्हाला शिकवलं नाही, असेही भुजबळ म्हणाले.
हे ही वाचा:
काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीतून मुख्यमंत्री अशोक गेहलोत बॅकफूटवर?
PFI च्या निशाण्यावर होते संघाचे मुख्यालय
रशियामध्ये शाळेत झालेल्या गोळीबारात सहा जणांचा मृत्यू
विद्यार्थ्यांची बस ५०० फूट दरीत कोसळली आणि
ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी भुजबळ यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली असून देवी सरस्वतीवरुन केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत छगन भुजबळ यांनी हिंदूंची माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. महात्मा फुले दामपात्यांचे फोटो शाळेत असायलाच हवे, बाबासाहेबांचे पण असावेत. पण, सरस्वती माता, शारदा मातेला छगन भुजबळ यांचा आक्षेप का ? असा सवाल आनंद दवे यांनी उपस्थित केला आहे.