अश्विनी भिडे यांचे स्वागत करायला स्टाफ धावला!

अश्विनी भिडे यांचे स्वागत करायला स्टाफ धावला!

आयएएस अधिकारी अश्विनी भिडे यांनी मुंबई मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांचे ज्या पद्धतीने जंगी स्वागत झाले, ते पाहता या प्रकल्पासाठी भिडे यांची पुनर्नियुक्ती करण्यासाठी सगळेच आतुर होते, हे स्पष्ट झाले.

व्यवस्थापकीय संचालक या पदाचा कार्यभार स्वीकारण्यासाठी अश्विनी भिडे कार्यालयात आल्यावर सर्व कर्मचाऱ्यांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. वेलकम बॅक, वेलकम बॅक अशा शब्दांत त्यांचे स्वागत करण्यात आले. अश्विनी भिडे या पुन्हा या कार्यालयात आल्याचा आनंद कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. त्या मुख्य प्रवेशद्वारातून आपल्या खुर्चीपर्यंत जाईस्तोवर टाळ्यांचा कडकडाट सुरू होता.

उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाखाली अडीच वर्षे काम करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने भिडे यांची बदली केली होती. तेव्हा मुंबई मेट्रोच्या आरे कारशेडचा वाद निर्माण झाला होता. या कारशेडला स्थगिती देण्यात आली आणि कांजूरमार्ग येथे ही कारशेड करण्याचा घाट घातला गेला. तेव्हा भिडे यांना तेथून हटविण्यात आले. पण एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर मात्र या प्रकल्पाला पुन्हा गती मिळणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून भिडे यांना पुन्हा या प्रकल्पात सहभागी करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

शिंदे- फडणवीस फेविकॉलचा मजबूत जोड, टुटेगा नही!

पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री योगींचा फोटो कचऱ्यात, कर्मचाऱ्याने गमावली नोकरी

पुलवामात भ्याड दहशदवादी हल्ला, एक जवान शहीद

“मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी मंत्रीपरिषद अस्तित्वात येत नाही तोपर्यंत निर्णय घेऊ नये असे संविधानात नाही”

 

अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांच्या स्वाक्षरीचे पत्र भिडे यांना १२ जुलैला पाठविण्यात आले होते. त्यांनी व्यवस्थापकीय संचालक मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन, मुंबई या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात येत आहे, तो एस. व्ही. आर. श्रीनिवास यांच्याकडून स्वीकारावा असे या पत्रात नमूद करण्यात आले होते.

अभिनेता सुमित राघवन यानेही अश्विनी भिडे यांच्या या पुनर्नियुक्तीचे स्वागत केले होते. येस अब आएगा मजा असे त्याने म्हटले होते. या प्रकल्पाला योग्य गती प्राप्त व्हावी म्हणून तुम्ही

 

Exit mobile version