राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी काही आमदारांना सोबत घेऊन सरकारमध्ये प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले असून आरोप- प्रत्यारोपांची मालिका सुरू आहे. मंगळवार, ४ जुलै रोजी अजित पवारांवर हल्लाबोल करताना शरद पवार म्हणाले की, त्यांचा फोटो फक्त त्यांचा पक्ष वापरू शकतो. “मी जिवंत आहे तोपर्यंत माझा फोटो वापरणे हा माझा अधिकार आहे”, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
“ज्यांनी माझ्या विचारांचा विश्वासघात केला. माझे आता त्यांच्याशी वैचारिक मतभेद आहेत. त्यांनी माझ्या परवानगीनंतरच माझा फोटो वापरावा,” असे शरद पवारांनी स्पष्ट केले आहे. तसेच राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, काँग्रेस नेते नाना पटोले यांनी शरद पवार यांची भेट घेतली. यानंतर मविआ महाराष्ट्रभर दौरा करण्याचा विचार करत असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर शरद पवार उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रातील सर्व उलथापालथीनंतर राष्ट्रवादीचे प्रमुख नेते कोण आहेत हे बुधवारी स्पष्ट होणार आहे. अजित पवार आणि शरद पवार यांनी ५ जुलैला राष्ट्रवादीची बैठक बोलावली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नेते कोणाच्या बैठकीला जाणार यावरून राष्ट्रवादीमध्ये कोणाचे वजन जास्त आहे याची स्पष्टता मिळणार आहे.
हे ही वाचा:
आंदोलनकर्त्या कुस्तीगीरांच्या चाचणीचे भवितव्य अधांतरी
अफगाणिस्तानमधील महिलांचे ब्युटी सलून बंद होणार
उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा लागू करण्याच्या हालचाली
रविवारी अजित पवार आणि इतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपा आणि शिवसेना सरकारला पाठींबा दिला. तसेच अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्षाच्या चिन्हावर आणि नावावरही दावा केला आहे.