ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे. दापोलीमधील साई रिसॉर्ट बांधकाम प्रकरणी ईडीच्या वतीने विशेष पीएमएलए न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. दापोलीतील साई रिसॉर्टप्रकरणी तत्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडे आणि रिसॉर्सटचे मालक सदानंद कदम यांच्यासह सहा आरोपींविरोधात ईडीने विशेष सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात माजी मंत्री परब यांचे नाव नसल्याची माहिती आहे.
याप्रकरणी ईडीने आरोपपत्र दाखल केले असून त्यात देशपांडे आणि कदम यांची नावे आहे. त्यांच्याशिवाय सुधीर शांताराम परदुले, विनोद दिपोलकर, सुरेश तुपे, अनंत कोळी यांच्या नावांचाही समावेश आहे. याप्रकरणी आरोप झालेले माजी मंत्री अनिल परब यांचे नाव नसल्याची माहिती समोर आली आहे.
साई रिसॉर्टच्या बेकायदा बांधकाम प्रकरणात अनिल परब यांचं नाव पुढे आलं होतं. त्यानंतर सदानंद कदम, जयराम देशपांडे यांची नावंही समोर आली. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी सतत पत्रकार परिषदा घेत हे प्रकरण उचलून धरले होते.
मार्चमध्ये, ईडीने सदानंद कदम यांच्या जवळच्या सहाय्यकाला अटक केली होती. त्यानंतर, दापोलीचे माजी उपविभागीय अधिकारी जयराम देशपांडे यांच्या पाठोपाठ आणखी एकाला अटक करण्यात आली होती. दोघेही अद्याप न्यायालयीन कोठडीत असून विशेष न्यायालयात त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू आहे.
हे ही वाचा:
मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे निधन
मेक इन इंडियाची भरारी!! पहिले एअरबस C295 भारताच्या ताफ्यात येणार
सागरी जगभ्रमणासाठी आता मोहिमेवर निघणार नौदलाची महिला अधिकारी
‘द केरळा स्टोरी’ला विरोध करणारे आयसीसचे समर्थक
रत्नागिरीतील जमीन खरेदीसाठी अनिल परब यांनी त्यांच्याशी संपर्क साधला होता आणि त्यानंतर कदम यांनी राजकारण्यांच्या इशार्यावर अनियमितता केल्याचा आरोप ईडीने केला होता. दापोली रिसॉर्ट प्रकरणी ईडीने सहा महिन्यांपूर्वी अनिल परब यांची सखोल चौकशी केली होती. त्यावेळी परब यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले होते. ईडीने त्याचवेळी अनेक ठिकाणी छापेमारी देखील केली होती.